एक्स्प्लोर

Manoj Jarange : दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठे कलाकार, रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपची वाट लावली : मनोज जरांगे

एकीकडे गोड बोलायचे, दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे. त्यांच्यामुळेच भाजप संपत आहे, अशी टीका मनोज जरांगेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.

जालना: सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) नाही मिळाली तर संध्याकाळपासून पाणीही सोडणार, असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिलाय. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आंदोलन शांततेतच होणार, आरक्षण मिळाल्या शिवाय आंदोलन थांबवणार नाही. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असंही जरांगे म्हणाले. दोनपैकी एक उपमुख्यमंत्री मोठे कलाकार, रंगीबेरंगी लोकांना घेऊन भाजपची वाट लावली असे म्हणत  फडणवीसांचं नाव न घेता मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे.  

जालना जिल्ह्यातही इंटरनेट सेवा बंद, दोन दिवस सेवा बंद ठेवण्याचे सरकारचे आदेश दिले आहेत. यावर जरांगे म्हणाले, मराठा आंदोलन दडपण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मराठा समाजाचे आंदोलन मोडण्याचा हा डाव आहे. मराठा आरक्षण भेटल्या शिवाय हटणार नाही. हजारो लोकांनी मला रात्री खडा पहारा दिला आहे. इंटरनेट बंद करून आंदोलन मोडू शकत नाही.  100 टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा डाव दिसतोय, कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवणार नाही. 

जरांगेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका

मनोज जरांगेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले,  एकीकडे गोड बोलायचे, दुसरीकडे गुन्हे दाखल करायचे. त्यांच्यामुळेच भाजप संपत आहे. स्वतःला उच्च नेता समजतो आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल करतो. तू उच्च नेता आहेस  की खाली चिठ्ठ्या वाटायच्या लायकीचा आहे हे लवकरच कळेल.

लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी  सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, बैठक बोलावण्याची दुसरी वेळ आहे.  सर्वांनी स्पष्ट करावे तुम्ही आरक्षण  देणार आहे की  नाही किती वेळ लागणार आहे हे स्पष्ट करणे गरजेचे आहे.  नेत्यांनी मुंबई सोडू नये. लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे.  

सरकारचे लोक हिंसा करत आहेत

बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि नेते जयदत्त क्षीरसागर राहत असलेल्या बंगल्याला आग लावली.तसेच 72 एसटी जाळण्यात आले. याविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारचे लोक हिंसा करत आहेत. बीडच्या केज मधील आंदोलक विनाकारण उचलून नेले आहे.  

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget