जंगल आमचं, वाघ आरक्षणाची शिकार करेल; जरांगेंचा भिडेंना टोला, फडणवीसांवर निशाणा
छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. नाशिकच्या सभेत फक्त आठ हजार लोक आले होते अशी टीका भुजबळांनी केली होती.
जालना : मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलं? असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलंय. भिडेंच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. मनोज जरांगे पाटलांनीही (Manoj Jarange Patil) भिडेंच्या वक्तव्याला आक्षेप घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली आहे. फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय असं जरांगे म्हणाले. तर जंगल आमचं, वाघ आरक्षणाची शिकार करेल असेही ते म्हणाले. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले, जंगल आमचं आहे वाघ आरक्षणाची शिकार करेल. फडणवीसांनी हे नवीन अस्त्र काढलं वाटतंय..पण यांचा झेंडा उचलून कल्याण होणार नाही त्याला आरक्षणच लागेल. आम्ही पण छत्रपतींच्या विचारांचे हिंदू आहोत.
छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे : मनोज जरांगे
छगन भुजबळांना गणिताचा मास्तर केला पाहिजे असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. नाशिकच्या सभेत फक्त आठ हजार लोक आले होते अशी टीका भुजबळांनी केली होती. जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घाणीला घाणच ऐकू येणार आहे. भुजबळांनी आम्हाला संस्कार शिकवण्याची गरज नाही. आम्ही रिपोर्टला किंमत देत नाहीत. नाशिक त्याला दाखवून देईल किती लोक होते तर असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली आहे.
लोकसभेला कार्यक्रम केला आता विधानसभेलाही करून घ्या : मनोज जरांगे
सोलापूरला किती पब्लिक होती किती दाखवली हे माहित आहे. लोकसभेला कार्यक्रम केला आता विधानसभेलाही करून घ्या. छगन भुजबळ काय सांगतो हे आम्हाला महत्वाचं नाही नाशिक त्याला दाखवून देईल सगळे सिट पाडून, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद वाढणार
पुन्हा एकदा जरांगे आणि भुजबळ यांच्यातील वाद वाढणार असल्याचे दिसून येते. कारण, मनोज जरांगे हेदेखील भुजबळांच्या विधानावर प्रतिक्रिया देतील. दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहायचं की नाही, याचा निर्णय ते घोषित करणार आहेत.
हे ही वाचा :
जरांगेंकडं आता कोणी लक्ष देत नाही, नाशिकच्या रॅलीला केवळ 8 हजार लोकं; भुजबळांची बोचरी टीका