तो व्हिडिओ कुठला?, दर्ग्यावरील व्हायरल पोस्टसंदर्भात मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण; मी कट्टर हिंदू, कट्टर मराठा
बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ शिरुर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी, आयोजित मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
![तो व्हिडिओ कुठला?, दर्ग्यावरील व्हायरल पोस्टसंदर्भात मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण; मी कट्टर हिंदू, कट्टर मराठा Manoj Jarange's explanation regarding the viral post on the shrine of nekanur; I am hindu and maratha says manoj jarange patil तो व्हिडिओ कुठला?, दर्ग्यावरील व्हायरल पोस्टसंदर्भात मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण; मी कट्टर हिंदू, कट्टर मराठा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/1c6bbbd0822a1ad3a1c1e40e8e92663617179279657331002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना/बीड : लोकसभा निवडणुकीनंतर बीडमधील वातावरण तणापूर्व बनलं आहे. बीड (Beed) जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा जातीय संघर्ष निवडणूक प्रचारातही पाहायला मिळाला. तर, निवडणूक निकालानंतरही मतदानावरच ह्या जातीय वातावरणाचा परिणाम झाल्याचं दिसून आलं. बीडमध्ये बजरंग सोनवणेंचा विजय झाला असून पंकजा मुंडेंना 6 हजार मतांनी पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर, सोशल मीडियातून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये वॉर होत असल्याचं दिसून आलं. त्याच पार्श्वभूमीवर पाथर्डी, शिरुर आणि आज परळी बंदचं आवाहन करण्यात आलंय. दुसरीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा एक व्हिडिओ व फोटो व्हायरल होत आहे. मात्र, चुकीच्या व खोट्या माहितीद्वारे हा फोटो व्हायरल केला जात आहे. आता, स्वत: जरांगेंनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ शिरुर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी, आयोजित मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरल आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही सुरू आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांचा दर्ग्यातील एक फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, जरांगे पाटील यांनी औरंगजेबच्या दर्ग्यावर चादर चढवल्याचं खोटं सांगण्यात येत आहे. आता, स्वत: जरांगे पाटील यांनी या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना आपण कट्टर हिंदू, कट्टर मराठा असल्याचे म्हटले.
दर्ग्यावर चादर चढवल्याबाबत जरांगे म्हणाले
दर्ग्यावर चादर चढवल्याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज, हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना मानतो, चादरही चढवतो. तसं मी नेकनूर येथील दर्ग्यावर ही चादर चढवली होती. मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे, राहणार. मी कट्टर हिंदू आहे, माझं व्हिजन क्लेअर आहे. ज्याच्या त्याच्या धर्माचा प्रत्येकाला गर्व असला पाहिजे, मुस्लिमांना त्यांच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे, कट्टर मराठा आहे. मी धर्मपरिवर्तन करायला आलो नाही, सत्ता परिवर्तन करायला आलो आहे, असे स्पष्टीकरण मनोज जरांगे यांनी व्हायरल व्हिडिओसंदर्भात दिले आहे.
दरम्यान, जरांगे यांचा व्हायरल होत असलेला फोटो आणि व्हिडिओ हा नेकनूर येथील दर्ग्याच्या दर्शनाचा आहे. मुंबईकडे जात असताना जरांगे यांनी नेकनूर येथील पिरावर (दर्ग्यावर) जाऊन चादर चढवली होती. त्यावेळचा हा व्हिडिओ चुकीच्या माहितीसह व्हायरल केला जात आहे.
मराठा समाजाने शांत राहावे
कोणत्या जातीच्या नेत्याविरोधात स्टेटस ठेवण चुकीचे, मराठा समाजाला माझं आवाहन आहे शांतता राखा, पण बाकीच्यांना शांतता राखा म्हणायचे काम नाही, त्यांचे नेते त्यांना म्हणत नाहीत. माझं लढणे काम आहे, मी करतो. मराठा समाजाने शांत राहावं , त्यांनी त्यांची शेतीची कामे करावी. माझ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची सरकारची भूमिका असू शकते. सरकारची भावना माहित नाही, मी माझे कर्तव्य पार पाडत आहे, असे देखील जरांगे म्हणाले.
पोलिसांचा वॉच, शांततेचं आवाहन
बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरुर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. याच दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अनुसरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचाच निषेध म्हणून आज मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केलीय.दरम्यान, बीडमधील या परिस्थितीवर पोलिसांचा वॉच असून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)