सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
आम्हाला कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.
Manoj Jarange Patil : आम्हाला कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच सगेसोयरेच्या अंमलबजावणी व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणं करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
तुम्ही गुलालाचा अपमान करु नका. कोणाच्याही दबाबावाला बळी पडू नका असेही जरांगे पाटील म्हणाले. कुणबी म्हणून सरकारी नोंदी या मुस्लिम समाजाच्या देखील निघाल्या आहेत. त्यांच्या नोंदी सरकारी निघाल्या तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर देखील अन्याय झाला न पाहिजे.
पाशा पटेलांची देखील कुणबी म्हणून नोंद निघाल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण दिलं नाही तर राजकारणात उतरावं लागेल
राजकारण हा आमचा मार्ग नाही. आम्हाला राजकारणात जायचे नाही. पणआम्हाला जर आरक्षण दिलं नाही तर राजकारणात उतरावं लागेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आचारसंहितेच्या आधी आरक्षण द्या, नाहीतर आम्ही कोणालाच आमचे समजणार नाही. ज्याच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. राजकारण आमचा मार्ग नाही. पण आमच्या मागण्या मान्य होणार नसतील तर आम्हाला राजकारणात उतरावं लागले असे जरांगे पाटील म्हणाले.
ज्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना ओबीसीमधून आरक्षण देणार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे असे जरांगे पाटील म्हणाले. आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला राजकारणाचे देणेघेणं नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Maratha Reservation : मनोज जरांगे यांची विधानसभेसाठी 6 टप्प्यात चाचपणी, पहिल्यांदा मराठवाड्यात पडताळणी, जागांची यादी समोर, जाणून घ्या