(Source: Poll of Polls)
धनगर- मुस्लिमसह इतर समाजाच्या आरक्षणाचा विषयही मार्गी लागला पाहिजे, मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार, मनोज जरांगे म्हणाले...
Manoj Jarange Dharashiv Rally: धनगर समाजासह मुस्लीम समाजातील आरक्षणप्रश्नी मराठा समाज सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मनोज जरांगे यांनी दिले. धाराशिवमध्ये शांतता रॅलीत ते सहभागी झाले होते.
Dharashiv News: धनगर-मुस्लिम समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागला पाहिजे. मोठा भाऊ म्हणून मराठा समाज त्यात पुढाकार घेणार असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे म्हणाले आहेत. धाराशिव शहरात आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांतता रॅली काढण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
ओबीसी समाजातील अनेकांना माझ्या विरोधात तयार केले आहे. भुजबळ यांचा डाव लोकांनी ओळखलाय. त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण होणार नाही. सर्व जाती धर्मातील लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत. त्यांचेही अनेक विषय आहेत. राजकारण्यांनी प्रत्येकाचा विषय सोडवला पाहिजे असे म्हणत मुस्लिम,धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही प्रलंबित आहे. ही खेदाची बाब आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, मंगळवारी लातूरमध्ये झालेल्या शांतता रॅलीनंतर आज ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या तरुणांना भेटण्यासाठी ते गेले होते. यावेळी धनगर मराठा एकजूटीचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या होत्या.
मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणार- मनोज जरांगे
धाराशिव शहरातील हजरत शमशुद्दीन गाझी दर्गाला मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी चादर चढवली. विविध पक्षातील मुस्लिम समाज बांधव आणि सामाजिक संघटना यांनी एकत्र येत पाठिंबाचे पत्र मनोज जरांगे पाटील यांना दिले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी मुस्लिम समाजातही आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले.
दरम्यान आज धाराशिव येथे शांतता रॅलीत ते सहभागी झाले होते. शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत रस्त्यावर भगव्या पताका आणि बॅनर घेऊन मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.
धनगर आरक्षणासाठी उपोषणकर्त्यांना मनोज जरांगेंची भेट
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनगर आरक्षणाच्या संदर्भात उपोषणाला बसलेल्या दोन तरुणांची भेट घेतल्याचे समोर येत आहे. लातूर शहरात मागील बारा दिवसांपासून या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांची प्रकृती खालावली आहे. त्यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल झाले होते.
मनोज जरांगे लांडगा, कळपात शिरुन त्यांनाच फस्त करेल; लक्ष्मण हाकेंचा इशारा
राज्यात मराठा आणि धनगर समाजाची एकत्रित मोट बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हा लांडगा असून तो धनगर समाजाच्या कळपात शिरुन मेंढ्या फस्त करेल. त्यामुळे धनगर बांधवांनी मनोज जरांगे यांच्यापासून सावध राहावे, असा धोक्याचा इशारा लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा: