Manoj Jarange Live : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शीघ्र कृती दल तैनात , मराठा आरक्षणाची प्रत्येक Live अपडेट एका क्लिकवर
Manoj Jarange Mumbai March Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जेसीबी लावून मनोज पाटील यांच्यावर फुल उधळली, फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं.

Background
Manoj Jarange Mumbai March Live Update : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता मुंबईच्या (Mumbai) वेशीनजीक येऊन ठेपले आहे. मराठा आरक्षण संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांनी जालना (Jalna), बीड (Beed), अहमदनगर (Ahmednagar) आणि आता पुणे (Pune) जिल्ह्याची सीमा ओलांडून मुंबईच्या वेशीवर धडक दिली आहे. विशेष म्हणजे लाखोच्या संख्येने असलेल्या या जनसमुदायाला घेऊन मनोज जरांगे उद्या (26 जानेवारी) रोजी मुंबईत धडकणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जेसीबी लावून मनोज पाटील यांच्यावर फुल उधळली, फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. पहाटे साडेचार वाजता मोठ्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाले.
Manoj Jarange : फसवून झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Manoj Jarange : सकाळी कुणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली, कोर्टाचे कागदपत्रं असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली, पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे. मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे.
Rohit Pawar : संविधानानं प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय, त्यांना मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही; रोहित पवारांच्या प्रतिक्रिया
Rohit Pawar : मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे युवावर्गाचं आंदोलन असून त्यांना कोणाही आझाद मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एबीपी माझाला दिली.























