एक्स्प्लोर
अंगाखाली बाभळीचे काटे, पोटावर पेटता दिवा, बाबाचा अघोरी उपवास!
बाभळीच्या काट्यावर झोपून एका बाबाने तब्बल दीड दिवस अघोरी उपवास केल्याचं समोर आलं आहे. मनिराम बाबा असं या अघोरी बाबाचं नाव आहे. ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर बाबाने आपला उपवास मागे घेतला.

अमरावती : बाभळीच्या काट्यावर झोपून एका बाबाने तब्बल दीड दिवस अघोरी उपवास केल्याचं समोर आलं आहे. मनिराम बाबा असं या अघोरी बाबाचं नाव आहे. ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर बाबाने आपला उपवास मागे घेतला. अमरावती जिल्ह्यातील धारणी गावात ही घटना घडली. बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवास करणाऱ्या बाबाचं नाव मनिराम बाबा असं आहे. गावातील कालीका मातेच्या मंदिरात ते पुजाअर्चा करतात. या बाबाने बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवासाला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर बाबाने पोटावर दिवादेखील ठेवला होता. परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना काट्यावरुन उतरण्यास भाग पाडलं. उपवासावेळी मध्यप्रदेश आणि मेळघाट परिसरातील काही लोकही उपस्थित होते.
आणखी वाचा























