मांढरदेवी गडावरील काळुबाई यात्रेचा आज शेवटचा दिवस
यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सडा येथे पाहायला मिळायचा. या ओलाव्यातून घसरडे झालेल्या पायऱ्यांवरुन काही भाविक घसरले जात होते. याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगरा-चेंगरी झाली.

सातारा : सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा आज संपन्न होत आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. 2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील यात्रा पूर्णपणे शासकीय धेयधोरणात पार पाडली जाते.
आज मांढरदेवी ट्रस्टचे प्रमुख न्यायाधीश यांच्या हस्ते सकाळी 6.20 वाजता पूजा आणि महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी या ठिकाणी देवीचा झालेला गजर सर्व भाविकांच्या उत्साहात भर टाकणारा होता. मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असल्याने राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात.
यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सडा येथे पाहायला मिळायचा. या ओलाव्यातून घसरडे झालेल्या पायऱ्यांवरुन काही भाविक घसरले जात होते. याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगरा-चेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता.
संतप्त झालेल्या भाविकांनी पोलिसांसह जिल्हाधिकारी यांनाही मारहाण केली होती. या घटनेनंतर दुर्लक्षित असणाऱ्या गडावर प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष गेलं आणि ही संपूर्ण यात्रा प्रशासनाने ताब्यात घेतली. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक समिती गठीत करण्यात आली. गडावरील सर्व सोई-सुविधा, भाविकांच्या अडचणी या समितीमार्फत पार पाडल्या जातात.
तसेच ही यात्राही समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडते. प्रशासकीय यंत्रणेने मांढरदेवी गडावरील अंधश्रध्दा संपुष्टात आणण्यासाठीही योग्य पावलं उचलली. त्यामुळे अनेक अनिष्ठ प्रथा व परंपरांना येथू हद्दपार झाल्या आहेत.
Before You Go
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
महत्त्वाच्या बातम्या






















