एक्स्प्लोर
Advertisement
जेव्हा विराट मोर्चा अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट देतो...
जालना : मराठा समाजाचे विराट मोर्चे निघत असताना या मोर्चातल्या शिस्तीचंही सर्वांकडून कौतुक होत आहे. मोर्चा सुरु असतानाच नागरिकांनी एका रुग्णवाहिकेला मोकळी वाट करुन देत माणुसकीचं दर्शन घडवलं.
जालन्यात ज्या मार्गावरुन मराठा समाजाचा मोर्चा जात होता, त्याच मार्गावरुन एक रुग्णवाहिका जात होती. त्यावेळी मोर्चेकरांनी भान राखून या रुग्णवाहिकेला वाट करुन दिली.
शिस्तीबरोबरच या विराट मोर्चात सामाजिक भानही जपलं जात असल्याचं समोर आलं आहे. मोर्चा आटोपल्यानंतर मार्गावरचा कचरा उचलण्यासाठी शेकडो हात गुंतलेले पाहायला मिळालं.
जालना शहरात सोमवारी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण, तसंच अॅट्रोसिटी रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणी, महिलांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
संबंधित बातमी :
विसर्जन मिरवणुकीत माणुसकीचं दर्शन, अॅम्ब्युलन्सला मोकळी वाट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement