एक्स्प्लोर

शॉकींग! संक्रांतीची पतंगबाजी जीवावर बेतली, चायनीज नॉयलॉन मांजाने एका जीव घेतला, 5 जणांचा गळा चिरला

Chinese Nylon String : राज्यभरात अनेक ठिकाणी चायनीज मांजामुळे दुर्घटना घडल्या असून त्यामध्ये एकाचा जीवही गेला आहे. चायनीज मांजावर बंदी असतानाही त्याचा वापर केला जात आहे. 

Chinese Nylon String : नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या  दिवशीच मांजाने एका दुचाकी स्वाराचा  गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक पोलिसांकडून नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्या विरोधात धडक करवाई केली जात असतानाच नागरिकांकडून ठिक ठिकाणी पोलिसांनाच  मज्जाव केला जात आहे. आपल्या पाल्यांना नायलॉन मांजा पासून दूर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांनी बजावणे अपेक्षित असताना पोलिसांच्या कामात अडथळा आणला जात असल्याचं दृश्य शहरात बघायला मिळाले.

नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहणारा  23 वर्षीय सोनू किसन धोत्रे गुजरात मधील महापालिकेत चालकाची नोकरी करत होता. संक्रांती निमित्ताने गुजरातहून नाशिकला निघाला होता. शकडो किलोमीटरचा प्रवास पार करून सोनू नाशिकध्ये पोहोचला. त्याचे घर अवघे 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असताना मांजाने गळा चिरून त्याचा जीव गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनूला स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांच्या आक्रोशाने संपूर्ण जिल्हा रुग्णालय परिसर हेलावून गेला.

येवला तालुक्यात 5 वर्षीय चिमुकल्याच्या नायलॉन मांजामुळे इजा होऊन 14 टाके पडले. तर पिंपळखुटे येथील शुभम पवार यांना देखील गळ्याला नायलॉन मांजामुळे इजा होवून 20 टाके पडले आहेत.

मांजामुळे हिंगोलीत तीन जणांच्या मान कापल्या 

मकर संक्रांतीनिमित्त युवकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पतंगबाजी केली जाते. ही पतंगबाजी केली जात असताना बंदी असलेल्या चायनीज मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या चायनीज मांजामुळे हिंगोलीमध्ये वेगवेगळ्या घटनेमध्ये तीन जणांची मान कापली गेली. यामध्ये दोन जणांची प्रकृती गंभीर असून एक जणाला किरकोळ दुखापत झाली आहे. शेख शेरू शेख दिवाण यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून यांना 22 टाके पडले आहेत. त्यांची तब्येत स्थिर आहे 
 
दुसऱ्या घटनेमध्ये राहुल कांबळे यांना सुद्धा मानेला दुखापत झाली असून त्यांच्या मानेला 6 टाके पडले आहेत.  तर अन्य एक जणाला मानेला किरकोळ दुखापत झाली आहे.

जळगावमध्ये मांजामुळे तरुणाचा गळा कापला

जळगाव शहरातील कानळदा शंभर फुटी रोडवर नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराजनगर मधील रहिवाशी विकी नारायण तरटे या तरुणाचा गळा कापला गेल्याची घटना घडली आहे. कामावरून परतताना ही दुर्घटना घडली. जखमी अवस्थेतही त्यांनी तातडीने स्वतः रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. 

वेळीच उपचार करण्यात आल्याने अनर्थ टळला असला तरी पतंगासाठी वापरण्यात येत असलेल्या या नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी असतानाही काही जण अशा प्रकारे पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा वापरतात. त्यामुळे अशा घटना वारंवार  घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

प्रशासनाकडून कारवाई

मकर संक्रांत निमित्त सर्वांनाच वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. पण हा आनंद घेत असताना पतंगासाठी वापरला जाणारा चायनीज नायलॉनचा मांजा हा कित्येकांच्या जीवावर उठणारा ठरला आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य नागरिकांचे गळे चिरले जात आहेत. तर आकाशात स्वच्छंद विहार करणाऱ्या पक्षांना सुद्धा त्यामुळे बऱ्याच वेळा जायबंदी व्हावे लागते. त्यामुळे नायलॉन मांजावर पोलिस आणि प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Embed widget