एक्स्प्लोर
Advertisement
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अरुणा ढेरे यांना माझा सन्मान पुरस्कार जाहीर
मुंबई: कवीयत्री, कादंबरीकार, लेखिका, समीक्षक अशा विविध क्षेत्रात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेल्या अरुणा ढेरे. त्यांच्या स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांना एबीपी माझाच्यावतीने माझा सन्मान पुरस्कार जाहीर झाला.
अरुणा ढेरे यांचा थोडक्यात परिचय
पिता आणि गुरुच्या रूपात लाभलेली, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांची कृपा-साऊली; घरात, जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे, ग्रंथांचा सहवास; आणि साहित्याने भारावलेलं एक विलक्षण वातावरण! त्यात भर म्हणून शब्दांवरचं त्यांचं प्रभुत्व, मानवी नात्यांतील आर्तता शोधणारी त्यांची संवेदना, आणि एका मातब्बर 'storyteller' चं उपजत 'timing!' डॉ. अरुणा ढेरे आपल्या लेखनाने वाचकाला मंत्रमुग्ध करणार हे ठरलंच होतं.
सहा कवितासंग्रह, तीन कादंबरी, सहा कथा संग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्या डॉ. ढेरे या २१व्या शतकपूर्वीच्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील. या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते.
त्यांचा 'विस्मृतिचित्रे' हा ग्रंथ अतिशय गाजला. त्याच बरोबर 'अंधारातील दिवे', 'उंच वाढलेल्या गवताखाली' सारखी वैचारिक पुस्तकं; 'निरंजन', 'प्रारंभ','यक्षरात्र', यांसारखे कविता संग्रह; कृष्णकिनारा','नागमंडल','मैत्रेय' यांसारखेकथासंग्रह वाचकांच्या वाङ्मयीन प्रवासातील श्रद्धास्थानं बनली आहेत. अरुणाताई ... आपल्या लेखणीला नवनवीन कल्पनांची शाई सदैव मिळत राहो ... ही 'माझाची' सदिच्छा.
संबंधित बातम्या
ललिता बाबरचा माझा सन्मान २०१६ पुरस्काराने गौरव
आपल्या आवजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या महेश काळेंचा ‘माझा सन्मान २०१६’ने गौरव
स्वच्छतेला उद्योगाचं स्वरुप देणाऱ्या हणमंत गायकवाडांचा ‘माझा सन्मान 2016’ने गौरव
कलाक्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. सुधीर पटवर्धन यांचा ‘माझा सन्मान 2016’ने गौरव
गरीब वृद्धांचे दु:ख दूर करणाऱ्या मार्क डिसूझा यांचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
संशोधन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या डॉ. शुभा टोळेंचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
महाराष्ट्राला याड लावणाऱ्या आर्ची आणि परश्याचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
एक उत्तम दिग्दर्शक म्हणून नावा रूपाला आलेल्या नागराज मंजुळेचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा आधार बनलेल्या नाम फाऊंडेशनचा गौरव
दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या पाणी फाऊंडेशनचा माझा सन्मानने गौरव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement