एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision 2024 : लवकरच मोठा चेहरा अजित पवारांकडे येणार, सुप्रिया सुळेंचेही स्वागत; प्रफुल पटेलांचे माझा व्हिजनवर सूचक वक्तव्य

Majha Maharashtra Majha Vision 2024 :  अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच एक मोठा नेता प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केला.

Majha Maharashtra Majha Vision 2024 :  लवकरच एक मोठा चेहरा अजित पवारांच्यासोबत (Ajit Pawar) येणार आहे. त्या व्यक्तीसोबत राज्यसभा निवडणुकीच्या आधी चर्चा सुरू होती असा गौप्यस्फोट  राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) (NCP Ajit Pawar) नेते प्रफुल पटेल ( Praful Patel) यांनी केला. आमच्या पक्षात सुप्रिया सुळेंचेही स्वागत आहे. त्यांना आम्ही अद्यापही नकार दिला नाही. त्यांच्यावर आम्ही टीका देखील नसल्याचेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. 

एबीपी माझाच्या माझा व्हिजनमध्ये प्रफुल पटेल यांनी राजकीय मुद्यांवर भाष्य करताना आगामी काळातील काही सूचक वक्तव्येही केली. यावेळी प्रफुल पटेल यांनी 2014 आणि 2019 मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीने जाण्याच्या निर्णयावर गौप्यस्फोट केले. 

राज्यसभा निवडणुकीत प्रफुल पटेल यांना राज्यसभेची खासदारकी असताना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्याबाबत प्रश्न विचारला असताना प्रफुल पटेल यांनी गौप्यस्फोट केला. त्यांनी म्हटले की, एका मोठ्या व्यक्तीसोबत आमची चर्चा सुरू होती. काही बैठकाही झाल्या. पण, अखेर त्यांच्याबाबत निर्णय पुढे ढकलण्यात आला असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. लवकरच हा मोठा चेहरा अजित पवारांकडे येणार आहे. काही दिवस नाव गुलदस्त्यात राहणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. सुप्रिया सुळे आमच्यासोबत आल्या तर त्यांचे स्वागत आहे.  त्यांना आमचा नकार नाही. त्यांच्यावर आम्ही टीका देखील नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. 

तो निर्णय फक्त आमच्या तिघांमध्येच... 

प्रफुल पटेल यांनी म्हटले की, 2014 विधानसभा निवडणूक निकालानंतर आम्ही भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपजवळ गेलो. त्यानंतर राजकीयदृष्ट्या जवळ-लांब जात राहिलो. शरद पवारांबद्दल वैयक्तिक टीका नाही, रोष नाही. मात्र, आमची राजकीय भूमिका वेगळी आहे.शरद पवारांसोबत राजकीय भूमिका घेण्याबाबत मतभेद झाले. 2019 मध्ये भाजपसोबत चर्चा झाली होती, असा दावा पटेल यांनी केला.  

राष्ट्रपती राजवट अशीच लागत नसते. त्यावेळी मोठ्या पक्षांसह इतरांनीदेखील सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. एक महिन्याच्या राष्ट्रपती शासनकाळाची कोंडी फोडण्यासाठी  शपथविधी झाला असल्याचे त्यांनी म्हटले. 2019 मधील भाजपसोबतच्या शपथविधी बाबतच्या निर्णयाबाबत अजित पवार, शरद पवार आणि मी अशा आम्हा तीन लोकांमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळी इतरांना कल्पना नव्हती. आमच्याच ही बाब ठेवली असल्याचा गौप्यस्फोटही पटेल यांनी केला.  

इंडिया आघाडीकडे मोदी विरोधाशिवाय व्हिजन नाही

विरोधकांकडे विकासाच्या मुद्यावर व्हिजन नसून फक्त मोदी विरोध हाच एकमेव मुद्दा असल्याचे पटेल यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कारकीर्दीत केलेल्या विकास कामाला विरोधकांकडे काय उत्तर आहे, असा सवालही त्यांनी केला. मागील दोन लोकसभा निवडणुकीत जनतेने मोदींना प्रतिसाद दिला. आताही निवडणुकीत साथ देतील असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला. 

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन'ला राजकीय नेत्यांची मांदियाळी

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision 2024) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांच्यासह राज्यातल्या प्रमुख नेत्यांशी दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. आज दिवसभर एबीपी माझावर 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे, एमआयएमआयचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.  

'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डलवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
Abhishek Sharma News : आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti clash: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी
Eknath khadse : राष्ट्रवादीचा प्रचार करताना भाजपला मतदान करण्याचं खडसेंकडून आवाहन
Mahebub Shaikh on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंचे नाव गोरे आणि काम काळे, महेबूब शेख यांची टीका
Bhaskar Jadhav vs Vinayak Raut : भास्कर जाधव - विनायक राऊतांमध्ये संघर्ष, रत्नागिरीत नाराजीनाट्य
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
राज्यातील 20 नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या, प्रभागात कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, सोलापूर, चंद्रपूरचा समावेश
Abhishek Sharma News : आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
आधी 12 चेंडूत अर्धशतक, मग 32 चेंडूत शतक, अभिषेक शर्माची वादळी खेळी, मोडले 6 मोठे विक्रम
California Mass Shooting: बँक्वेट हॉलमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी; उपस्थितांना वाटलं बर्थडे सेलिब्रेशनचे फटाकड्या फुटत आहेत!
बँक्वेट हॉलमध्ये मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबारात 4 जणांचा मृत्यू, 10 गंभीर जखमी; उपस्थितांना वाटलं बर्थडे सेलिब्रेशनचे फटाकड्या फुटत आहेत!
Ditwah Cyclone: तामिळनाडू, पुद्दुचेरीला आज 'दितवाहा' चक्रीवादळ धडकणार; 54 विमान उड्डाणे रद्द, शाळा बंद, श्रीलंकेत 150 जणांचा जीव घेतला,  300 भारतीय श्रीलंकेत अडकले
तामिळनाडू, पुद्दुचेरीला आज 'दितवाहा' चक्रीवादळ धडकणार; 54 विमान उड्डाणे रद्द, शाळा बंद, श्रीलंकेत 150 जणांचा जीव घेतला, 300 भारतीय श्रीलंकेत अडकले
Mahayuti clash: मोठी बातमी: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी, दिल्लीच्या बैठकीला अजितदादांच्या खासदारांची गैरहजेरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
'मला भीती दाखवताय आत टाकायची? हिंमत असल्यास टाकून दाखवा' लाव रे तो व्हिडिओ करत धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजप आणि पालकमंत्र्यांना ओपन चॅलेंज!
'मला भीती दाखवताय आत टाकायची? हिंमत असल्यास टाकून दाखवा' लाव रे तो व्हिडिओ करत धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजप आणि पालकमंत्र्यांना ओपन चॅलेंज!
Embed widget