(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Maha Katta Narayan Rane: मी अजूनही शिवसेनेत...नितेश मागच्या जन्मापासून भाजपात...असं निलेश राणे का म्हणाले?
Majha Maha Katta: एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे सुपुत्र डॉ. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला.
Majha Maha Katta: आपल्या ट्वीटमधून शिवसेना नेत्यांवर (Shiv Sena) आणि विरोधकांवर हल्लाबोल करणारे भाजपचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज शिवसेनेबाबत मोठं वक्तव्य केलं. मी अजूनही शिवसेनेत आहे. तर, भाऊ नितेश (Nitesh Rane) हा मागच्या जन्मापासून भाजपात आहे, असे वाटत असल्याचे म्हटले. शिवसेना सोडून जवळपास एक दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी शिवसेनेचा पिंड गेला नसल्याचे निलेश राणे यांनी म्हटले.
एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे सुपुत्र डॉ. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी निलेश राणे यांनी म्हटले की, शिक्षण पूर्ण होत असताना वडिलांसोबत फिरायचो. त्याकाळी वडिलांनी केलेला संघर्ष पाहिला आहे. राजकारणा ठरवून आलो नाही. मात्र, त्यांचा संघर्ष पाहून त्यांना मदत व्हावी असं वाटल्याने राजकारणात प्रवेश केला असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.
अजूनही शिवसेनेत...
पत्रकार परिषद, सोशल मीडियावर निलेश राणे वापरत असलेल्या भाषेवरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना निलेश राणे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पाहत आम्ही पाहत मोठे झालो आहोत. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे. माझी भाषा ही शिवसेनेची आहे. मी अजून तिकडंच अडकलो आहे. माझ कुळ शिवसेनेत असल्याची निलेश राणे यांनी म्हटले. तर, भाऊ नितेश राणे हा आधीपासून भाजपात आहे की काय असं वाटत असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. मागच्या जन्मापासून नितेश भाजपात आहे की असं वाटतंय...माझी गाडी अजूनही तिथेच आहेच..असं निलेश राणे यांनी म्हटले.
वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात यश...
माझा महाकट्टा कार्यक्रमात राणे पिता-पुत्रांनी कौटुंबिक स्नेहबंधाचाही उलगडा केला. घरातील निर्णय नारायण राणे घेत असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. वडील नारायण राणे यांनी सुरू केलेले, त्यांच्या हस्ते सुरू झालेल्या व्यवसायात यश आले. मात्र, आम्ही सुरू केलेल्या व्यवसायात अपयश आले असल्याचे निलेश राणे यांनी म्हटले.
नारायण राणे यांनी कोणतीही गोष्ट लादली नसल्याचे आमदार नितेश राणे यांनी म्हटले. एमबीए करण्याआधी वकिली करण्याची इच्छा होती. एलएलबी करण्याआधी वडील नारायण राणे यांना मनातील इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी त्यांनी कटाक्ष टाकत व्यवस्थितपणे काही गोष्टी समजवून सांगितल्या. व्यवसायालापूरक असे शिक्षण घेतल्यास फायदा होईल हे त्यांनी समजावून सांगितले. आज त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा फायदा होत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.