Majha Katta : मंत्रीपद मिळालं नाही तर प्लॅन बी तयार, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
रचनात्मक काम करण्यासाठी काही पदांची गरज असते. त्यामुळं पदं ही महत्त्वाची असतात, असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.
Majha Katta With Bachchu Kadu : रचनात्मक काम करण्यासाठी काही पदांची गरज असते. पदं ही महत्त्वाची असतात, त्याचा अधिक लोकांना फायदा कसा होईल हे पाहणं गरजेचं असल्याचे आमदार बच्चू कडू यावेळी म्हणाले. मंत्रीपदाबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधीच बोलणार नाही. हा माझा व्यक्तिगत विषय असल्याचे कडू म्हणाले. सगळ्या गोष्टी बोलून चालत नाही. काही गोष्टी समजायला पाहिजे. नाही समजल्या तर ते माझं दुर्दैव आहे. समजल्या तर फारच चांगले. पण मंत्रीपदासाठी मी बोलावं एवढा मी खुळा नाही आणि ते तेवढे लहानपण नाहीत असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर (Majha Katta) हजेरी लावली. यावेळी त्यांनी संवाद साधला.
मंत्रीपद मिळालं नाही तर माझा प्लॅन बी तयार
मंत्रीपद नाही दिलं तर मी अधिक धावेन. फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी दिलं तर चांगलं, नाही दिलं तर त्यापेक्षा चांगलं अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली. 100 दिवसात या सरकारनं चांगले निर्णय घेतल्याचेही कडू यावेळी म्हणाले. मी मंत्री नाही झालो तर मरणार आहे का? नाही पद मिळालं तर आणखी वेगळं काही करेल असेही कडू म्हणाले. मंत्रीपद मिळालं नाही तर माझा प्लॅन बी खूप व्यवस्थित तयार असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.
शिवसेनेचं संघटनं कोसळल याचं वाईट वाटतं
मला मंत्रीपद द्याव यासाठी म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोललो नाही. बोलणारही नाही. मी सध्या वाट पाहत असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मंत्रीपद नाही दिलं तर ठिक आहे. दिलं तर ठिक असे ते म्हणाले. शिवसेनेचं संघटनं कोसळल याचं वाईट वाटत असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी जरी ओकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलो तरी शिवसेनेतील ही लढाई मुख्यमंत्री पदापर्यंत टीक होती, पण पक्षापर्यंत जायला नको होती असे बच्चू कडू म्हणाले. 40 आमदार पार्टीतून जाणं ही काय लहान गोष्ट नाही. ते कोणत्या कारणासाठी गेले हे शिंदेंनी सांगितले आहे, असे कडू म्हणाले.
ओला दुष्काळ जाहीर व्हावा पण .....
राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या नुकासन झालं आहे. अशा स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी विचारले असता ते म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करायला काही हरकत नाही, पण ओला दुष्काळ जाहीर करुन पैसे नाही दिलं तर काही अर्थ नाही. त्यामुळ निधी मिळणं गरजेचं आहे. जे नुकसान झालं त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवे असे कडू यावेळी म्हणाले. दोन कामं कमी करा पण शेतकऱ्यांना मदत करा, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Majha Katta : रवी राणांना पुढे करुन जर कुणी गेम करत असेल तर.... बच्चू कडूंचा थेट इशारा