एक्स्प्लोर

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये केवळ दोन वर्षे गुंतवणूक आणि बनाल लखपती! महिलांसाठीही ही खास योजना तुम्हाला माहिती आहे का? 

Mahila Samman Savings Certificate : जर महिलांना कमी कालावधीत चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस महिला बचत योजनेत गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवू शकतात.

Mahila Samman Savings Certificate : देशातील महिलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आली होती. महिला बचत सन्मान योजना असं या योजनेचं नाव असून ती पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme For Women)  माध्यमातून राबवण्यात येते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये मोठा परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक बँकांच्या माध्यमातूनही ही गुंतवणूक करता येऊ शकते. 

काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना? (Mahila Samman Savings Certificate)

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक अल्प बचत योजना आहे. त्यामध्ये महिला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर 7.50 टक्के व्याजदर चक्रवाढ आधारावर उपलब्ध आहे. 

मुदतपूर्व पैसे काढू शकता

या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. तुम्ही मार्च 2024 मध्ये पैसे गुंतवल्यास, खात्याची मॅच्युरिटी मार्च 2026 मध्ये होईल. परंतु अनेक वेळा पैसे गुंतवल्यानंतर, गरज पडल्याने लोकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करावे लागते. अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळते. एका वर्षानंतरही तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.

MSSC खात्याचे मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम काय आहेत?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा मिळते. याशिवाय जर कोणत्याही खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत नॉमिनी पैसे क्लेम करून जमा केलेली रक्कम काढू शकतो. तसेच खातेदार कोणत्याही मोठ्या आजाराच्या वेळी खात्यातून मुदतपूर्व पैसे काढू शकतो. तुम्ही कोणत्याही कारणास्तव मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला 7.50 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.

या योजनेसाठी खाते कसे उघडायचे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणत्याही वयोगटातील महिला हे खाते उघडू शकतात. सरकारने यासाठी कोणतेही वय निश्चित केलेले नाही. अल्पवयीन मुलीचे खाते पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाते. पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हे खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता. खाते उघडताना तुम्हाला एक फॉर्म सबमिट करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुम्ही या खात्यात दोन लाख रुपये जमा करू शकता.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावटNew Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 01 जानेवारी 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 01 January 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
Embed widget