एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahayuti Seat Sharing In Maharashtra : भाजपकडून 23 उमेदवार घोषित, अजूनही 8 ते 9 जागांसाठी दावेदारी; शिंदे-पवारांना 'या' जागा मिळणार?

Mahayuti Seat Sharing In Maharashtra : शिवसेनेकडील (2019 च्या निकालानुसार) एकूण 23 जागांवरती मात्र अजूनही उमेदवार घोषित झालेले नाहीत. या ठिकाणी काही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे.

Mahayuti Seat Sharing In Maharashtra : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाराष्ट्रात (Maharashtra) आतापर्यंत भाजपकडून त्यांनी 2019 मध्ये जिंकलेल्या 22 आणि चंद्रपूरच्या जागेवर उमेदवार घोषित केले आहेत. मात्र पूनम महाजन यांची अजूनही उमेदवारी घोषित केलेली नाही. त्यामुळे राज्यात आतापर्यंत भाजपने 23 जागांवरती उमेदवार घोषित केले असून काँग्रेसने 12 जागांवर उमेदवार घोषित केले असून 9 ठिकाणी लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपने 23 उमेदवारी जाहीर करताना 5 विद्यमान खासदारांना घरचा रस्ता दाखवला आहे. यामधील मुंबईमधील दोन जागांचा समावेश आहे. प्रितम मुंडे यांचा पत्ता कट करून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जागेवर ज्या ठिकाणी 2019 मध्ये काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला होता, त्याठिकाणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवलं आहे. मुंबई उत्तर मध्ये या जागेवरती पुनम महाजन यांची उमेदवारी मात्र अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. 

भाजपकडून 23 उमेदवार जाहीर, पण... 

शिवसेनेकडील (2019 च्या निकालानुसार) एकूण 23 जागांवरती मात्र अजूनही उमेदवार घोषित झालेले नाहीत. या ठिकाणी काही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. तसेच शिंदेंकडील नाराजी असलेल्या खासदारांचा पत्ता कट करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे, पण शिंदे पाठिंबा दिलेल्या 13 खासदारांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपकडून विरोध असल्याने गुंता वाढला आहे. त्यामुळे याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडील एकही उमेदवार आतापर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदे गटाकडून सुद्धा एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. 

कोणत्या जागांवर अजूनही वाद?

जाहीर न केलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, धाराशिव, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर शिंदेंचा उमेदवार असणार की भाजपचा असणार यावर अजूनही चर्चा सुरुच आहे. या जागांवर शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवार गटातील खासदार आहेत. यामधील शिंदेंच्या खासदारांवर नाराजी असलेल्या जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. 

भाजपकडून दावा करण्यात आलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, मुंबईमधील तीन जागा आणि पूनम महाजन यांची जागा तसेच आणि कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेचा समावेश आहे. या जागा भाजप घेणार की शिंदे गटालाच दिल्या जाणार याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता कायम आहे. यामध्ये जागांची आणि चिन्हांची सुद्धा अदलाबदल होण्याची शक्यता आहे. शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहेत. सातारच्या जागेवरून सुद्धा भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे या जागेवर उदयनराजे यांना तिकिट दिल्यास ते कोणाच्या चिन्हावरती लढणार? याकडे सुद्धा चर्चा आहे.

रासपला कोणती जागा सोडणार?

महादेव जानकर यांनी यू टर्न मारल्याने आता त्यांच्यासाठी एक जागा निश्चित झाली आहे. ती जागा आता कोणाची सोडली जाणार आणि कोणाचा पत्ता कट केला जाणार? याची चर्चा आहे. त्यांना परभणीची जागा सोडल्यास त्याठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराशी त्यांची लढत होईल. अमरावतीमधून नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर लढतील अशीच चिन्हे आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरही भाजपचा दावा आहे. 

कोणत्या जागांवर अजूनही उमेदवार घोषित नाहीत (2019 च्या निकालानुसार आणि आता कोणाकडे जागा) 

  • बुलडाणा - प्रतापराव जाधव (शिंदे गट)  
  • अमरावती - नवनीत राणा (अपक्ष) 
  • रामटेक - शिंदे गट - कृपाल तुमाने 
  • यवतमाळ - वाशिम - भावना गवळी (शिंदे गट) 
  • हिंगोली -  हेमंत पाटील (शिंदे गट) 
  • परभणी -  संजय जाधव (ठाकरे गट) 
  • औरंगाबाद - इम्तियाज जलील (एमआयएम)  
  • नाशिक - हेमंत गोडसे (शिंदे गट) 
  • पालघर - राजेंद्र गावित (शिंदे गट) 
  • कल्याण - श्रीकांत शिंदे (शिंदे गट) 
  • ठाणे - राजन विचारे (ठाकरे गट)
  • मुंबई - उत्तर पश्चिम -गजान किर्तीकर (शिंदे गट) 
  • मुंबई उत्तर मध्य - पुनम महाजन (भाजप) 
  •  मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिंदे गट) 
  • दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (ठाकरे गट) 
  • रायगड - सुनील तटकरे (अजित पवार गट) 
  • धाराशिव - ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) 
  • मावळ - श्रीरंग बारणे (शिंदे गट) 
  • बारामती - सुप्रिया सुळे (शरद पवार गट) 
  • शिरुर - अमोल कोल्हे (शरद पवार गट) 
  • शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिंदे गट) 
  • सातारा - श्रीनिवास पाटील (शरद पवार गट) 
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत (ठाकरे गट) 
  • कोल्हापूर - संजय मंडलिक (शिंदे गट) 
  • हातकणंगले - धैर्यशील माने (शिंदे गट) 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Embed widget