एक्स्प्लोर

Mahatma Phule : उद्योजक ते सामाजिक क्रांतीतील अग्रणी ; महात्मा फुले यांच्या या 10 गोष्टी जाणून घ्या

Mahatma Phule Birth Anniversary : सामाजिक चळवळीतील अग्रणी नेतृत्व करणे असो किंवा उद्योग क्षेत्र असो महात्मा फुले यांनी आपला ठसा उमटवला. जाणून घेऊयात त्यांच्या बाबत महत्त्वाच्या 10 गोष्टी

Mahatma Phule Birth Anniversary :   महाराष्ट्रासह देशातील समाजसुधारणेच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. महात्मा  फुले यांनी सामाजिक सुधारणांची चळवळ उभारताना उद्योग क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. महात्मा फुले यांनी एक प्रकारे सामाजिक सुधारणांची चळवळ चालवताना दुसरीकडे देश उभारणीचे ही कार्य केले. जाणून घेऊयात महात्मा फुले यांच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी: 

- शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून मुलींसह सर्व शोषित घटकांना शिक्षण मिळायला हवे अशी त्यांनी सातत्याने मागणी केली. एक जानेवारी 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले या मुलींच्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांच्यासह फातिमा शेख यांनीदेखील मुलींच्या शिक्षणात वाटा उचलला. 

- महात्मा फुले यांनी 1882 मध्ये हंटर आयोगाकडे सर्वांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली. अशी मागणी करणारे ते देशातील पहिले समाजसुधारक होते. त्याशिवाय अस्पृश्य समाजातील वस्त्यांमध्ये अधिकाधिक शाळा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची असावी असेही त्यांनी सुचवले. 

- समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यावर भाष्य करणारे 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहीला. समाज प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीसाठी हा महत्त्वाचा ग्रंथ ठरला.

- महात्मा फुले यांनी विधवांच्या हक्कासाठी संघर्ष केला. 1860 मध्ये विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आणि 1865 मध्ये विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्याआधी त्यांनी 1864 मध्ये विधवा विवाह घडवून आणला. 

- महात्मा जोतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक विषमता नष्ट करणे, सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे आदी सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. वर्णव्यवस्थेला आणि वेदांना झुगारत सत्यशोधक समाजाने काम सुरू केले. 

- महात्मा फुले यांनी 1855 मध्ये तृतीय रत्न हे नाटक लिहीले. हे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक असल्याचे म्हटले जाते. सनातनी धर्माच्यााआधारे अशिक्षित, अस्पृश्य समाजाची फसवणूक कशी करतात यावर हे नाटक आधारले असल्याचे म्हटले जाते. परिवर्तनवादी चळवळ परिणामकारक करण्यासाठी नाटकाच्या रंगमंचाचा आधार महात्मा फुले यांनी घेतला असावा. 

- महात्मा फुले हे  'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते अशी माहिती प्रा. हरी नरके देतात. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली.  कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा ही कामे महात्मा फुले यांच्या कंपनीने केली आहेत. 

- महात्मा फुले यांच्या कंपनीचे भागिदार किंवा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेल्या व्यक्तिंनी बांधकाम क्षेत्रावर आपला ठसा उमटवला आहे. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे केली असल्याचे प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या एका लेखात सांगितले. 

- भारतातील पहिली कामगार संघटना 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. त्यांना कामगार संघटना स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले. 

- महात्मा फुले यांनी 1875 मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात खतफोडीचे बंड घडवून आणले.

- 1888 मध्ये मुंबईत जोतीराव फुले यांचा रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि महात्मा ही पदवी देण्यात आली. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget