Arvind Sawant : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीकेसीला होणार नाही का? दसरा मेळावा शिवाजी पार्कला घेण्यावरून अरविंद सावंत यांचा सवाल
Arvind Sawant : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीकेसीला निर्माण होणार नाही का? हे सरकार पक्षपाती भूमिका घेत आहे. आणखी काय म्हणाले अरविंद सावंत?
Arvind Sawant : मुंबई महापालिकेने शिवाजी पार्क (Shivaji Park) दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेची (Shivsena) आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीकेसीला निर्माण होणार नाही का? हे सरकार पक्षपाती भूमिका घेत आहे. असे सांगत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी भाजप तसेच शिंदे सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे
गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सुरु आहे का सगळं? - अरविंद सावंत
मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्था पाहता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. यावरून सावंत म्हणाले, पोलिसांना एवढी कायदा सुव्यवस्थेची काळजी असेल तर चुन चुन के मारेंगेंवर काय कारवाई केली? याचं देखील उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे. एफआयआर घेतली जात नाही, राज्य कुठे चाललंय? गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय सुरु आहे का सगळं? स्क्रिप्ट तिकडूनच येतंय. त्यामुळे कागद हातात घेऊन सगळं बोलावं लागतंय. भाजपने ठरवलंय शिवसेनेला आडवं जात राहायचं. सदा सरवणकर काँग्रेसमध्ये होते तेव्हा दसरा मेळावा कोण घेत होतं? असा सवालही सावंत यांनी केलाय.
मुस्लिम सर्वेक्षणाबाबत सावंत म्हणाले..
मुस्लिम समाज आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागे आहे. मात्र भाजपचा अजेंडा वेगळा आहे, महाराष्ट्रात शांतता पाहवत नाही आहे. असं सावंत म्हणाले.
हे राजकीय षडयंत्र - NIA छापेमारी संदर्भात अरविंद सावंत म्हणाले..
सातत्यानं एनआयएच्या धाडी पडत आहेत, या संस्था आज उभ्या राहिल्या का? एनआयए छापेमारी सुरु आहे, आता जागे झाले का तुम्ही? मात्र राजकीय फायदा कसा घेता येईल, त्यापद्धतीनं सर्व सुरु आहे. माणसाच्या जगण्याचे विषय भरकटवणं आणि मग हिंदू-मुस्लिम करत राहणं. या देशाचा इतिहास आहे, मोगलांनी राज्य केलं पण हिंदू संपले नाहीत. संतांची मांदियाळी तशीच सुरु राहिली, आपल्या भूमीवर असं काही घडणार नाही. मात्र याचा राजकीय फायदा कसा घेता येईल, भय निर्माण करण्याचा आणि पोलरायझेशन करण्याचा हा प्रयत्न आहे. आत्ताच कसं आठवलं, त्यातून उत्तर समजेल, हे राजकीय षडयंत्र आहे असं सावंत म्हणाले
आज आनंद दिघे असते तर...
तुमच्यावरच्या ईडीच्या केसचे काय झाले, सीबीआय, खूनाच्या केसचे काय झाले. आनंद दिघेंनी ठाण्यात गद्दारी केलेल्यांचं काय केलं माहिती आहे ना? गद्दारांना आसमान दाखवलं होतं. पाच वर्ष ठाण्यात विरोधी पक्ष नव्हता, आज आनंद दिघे असते ना तर यांचं काय झालं असतं कल्पना करा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देशात इतर ठिकाणी दंगली झाल्या मात्र आमच्या महाराष्ट्रात नाही झाल्या हीच सल भाजपला आहे
संबंधित बातम्या
Shivsena : 'गनिमी काव्यानं घेणार दसरा मेळावा', शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे ओपन चॅलेंज