Mumbai Traffic Update: मुंबईकरांनो! सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्गावरून प्रवास करताय? वाहतूक पोलिसांचे हे महत्वाचे ट्विट वाचले का?
Mumbai Traffic Update: मुंबई वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांना 3 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी वाहतुकी संदर्भात सतर्क करण्यात आले आहे,
Mumbai Traffic Update: मुंबईकरांनो! सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण मुंबई वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांना 3 ऑगस्ट म्हणजेच आज वाहतुकी संदर्भात सतर्क करण्यात आले आहे, यासंदर्भातील ट्वीट वाहतूक पोलिसांनी केलं आहे. बुधवारी सकाळी 10.30 ते 11.30 आणि दुपारी 12.30 ते 6 या वेळेत नियोजित अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या पूर्वनियोजित भेटीमुळे सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिल, तसेच मलबार हिल ते रिगल सर्कल या भागाच वाहतूक संथ राहील. नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करावे अशी विनंती वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
Due to a pre-scheduled VVIP visit on 3rd August, traffic is likely to be slow between Santacruz Airport, WEH to Malabar Hill from 10:30 AM to 11:30 AM & Malabar Hill to Regal Circle from 12:30 PM to 06:00 PM.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 2, 2022
Citizens are requested to plan commute accordingly.#MTPTrafficUpdate
ट्राफिकमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांसाठी
मुंबई पोलिसांनी वाहतूक शाखेचं नवीन ट्विटर हॅण्डल लॉंच केल्यामुळे याचा फायदा हा दररोज मुंबईतल्या ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांना होत आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतुकीसंदर्भात नागरिकांना माहिती दिली जाते. तसेच याच्या माध्यमातून मुंबईकरांना वाहतूकीसंबंधी तक्रारी आणि सूचनाही करता येत आहे. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीसाठी हा एक रामबाण उपाय असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर मुंबईकरांसाठी काही महत्वाच्या टिप्सही ट्विट करत असतात.
अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पूर्वनियोजित भेटीमुळे ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० - ११:३० दरम्यान सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिल व दुपारी १२:३० ते सायं. ६:०० दरम्यान मलबार हिल ते रिगल सर्कल येथे वाहतूक संथ राहील. नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करावे.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 2, 2022