एक्स्प्लोर

MahaRERA Results : रिअल इस्टेट एजंट्सच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर, 96 टक्के एजंट्स उत्तीर्ण

रिअल इस्टेट एजंट्ससाठी 20 मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 423 पैकी 405 उमेदवार यशस्वी झाले. ग्राहकहितासाठी एजंटसना अशी परीक्षा बंधनकारक करणारे महारेरा देशातील पहिलेच नियामक प्राधिकरण ठरले आहे.

मुंबई: स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्ससाठी म्हणजेच रिअल इस्टेट एजंट्साठी (MahaRERA Real Estate Agents Results) घेण्यात आलेल्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये 423 पैकी 405 उमेदवार यशस्वी झाले असून 96 टक्के निकाल लागला आहे. 20 मे रोजी स्थावर संपदा क्षेत्रातील एजंट्ससाठी परीक्षा घेण्यात आली होती. 

एजंट्स हे ग्राहक आणि विकासक यांच्यातील महत्वाचा दुवा आहेत. एजंट्सना ग्राहकांना विनियामक तरतुदींसह व्यवस्थित मार्गदर्शन करता यावे यासाठी विशिष्ठ प्रशिक्षणाच्या आधारे परीक्षा देऊन प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक करणारे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (MahaRERA) हे देशातील पहिलेच प्राधिकरण आहे.

राज्यात  20 मे रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, धुळे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक,  पुणे आणि सोलापूर अशा 10 ठिकाणी झालेल्या परीक्षेत अपेक्षित 457 पैकी 423 उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. या निकालाचे महत्वाचे वैशिष्ठ असे की यात तब्बल पाच उमेदवारांनी 90 टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. याशिवाय या यशस्वी उमेदवारांत 405 पैकी 36 उमेदवार हे 60 वर्षांवरील आहेत. यातही 6 उमेदवार 70 वर्षांवरील असून या सर्वांनी  70 टक्क्यांवर गुण मिळवले आहेत. यांच्यात मुंबईतील एस.एम. मालदे हे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून ते 74 वर्षांचे आहेत. 

या यशस्वी 405 उमेदवारांत 37 महिला उमेदवारही आहेत. गुणानुक्रमे संयुक्तपणे पहिल्या आलेल्यात पुण्यातील गीता छाब्रिया या पहिल्या स्थानावर आहेत.

महारेराने 10 जानेवारी 23 च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे. तसेच सध्याच्या सुमारे 39 हजार एजंटसनाही 1 सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच  मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना  रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.  त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार (Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र (Allotment letter) चटई क्षेत्र,  दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक  माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच  महारेराने  हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे. 

ही संबंधित बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM Superfast

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Embed widget