Zilla Parishad Elections | जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाला फटका? कुणाला लागली लॉटरी?
राज्यात जिल्हा परिषदेच्या 85 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीचे निकाल आता हाती येत आहेत. त्यानुसार कोणत्या पक्षाला फटका? कुणाला लागली लॉटरी? जाणून घ्या.
Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीचा निकाल आता हाती येत आहे. मंगळवारी झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल हाती आले आहेत. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे. निकालानुसार कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्या? कोणाला झाला फायदा? कोणाला बसला फटका? जाणून घेऊया.
कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्या?
पक्ष आधी किती आता किती
पालघर
जिल्हा परिषद 15
शिवसेना – 03 - 05
राष्ट्रवादी – 07 - 04
भाजप – 04 - 05
माकपची – 01 - 01
धुळे
जिल्हा परिषद - 15
भाजप 11 - 08
शिवसेना 02 – 02
काँग्रेस 02 - 02
राष्ट्रवादी – 00 - 03
नंदुरबार
जिल्हा परिषद 11
शिवसेना – 2 - 3
काँग्रेस – 2 - 3
भाजप – 7 – 4
राष्ट्रवादी - 0 - 1
अकोला
जिल्हा परिषद 14
वंचित : 06 - 06
वंचित समर्थित अपक्ष : 02 इतर - 03
भाजप : 03 - 01
शिवसेना : 01 - 01
राष्ट्रवादी : 01 - 02
काँग्रेस : 01 - 01
वाशिम
जिल्हा परिषद 14
शिवसेना -01 - 01
काँग्रेस -01 - 01
राष्ट्रवादी – 03 - 03
भाजप – 02 - 02
वंचित बहुजन आघाडी 04 - 04
इतर - 02 - जनविकास आघाडी - 02
अपक्ष – 01 – 01
नागपूर
जिल्हा परिषद 16
राष्ट्रवादी – 4 - 02
काँग्रेस – 7 - 09
शेकाप – 1 - 01
भाजप – 4 - 03