एक्स्प्लोर

Weekly Recap : राहुल गांधींची खासदारकी रद्द, राज ठाकरेंची सभा ते अधिवेशनाची सांगता, वाचा आठवड्यात काय घडलं?

Weekly Recap : 20 मार्च ते 25 मार्च यादरम्यान राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात या आठवड्यात घडलेल्या घटनांचा आढावा.

Weekly Recap : प्रत्येक आठवड्याच्या शेवटी आपण आठवडाभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा (Weekly Recap) आढावा घेत असतो. या चालू आठवड्यात म्हणजे 20 मार्च ते 25 मार्च यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. तसेच राज्य विधीमंडळाच्या अधिवेशानत सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यावरुन आमने-सामने आल्याचे पाहायला मिळालं. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, राज ठाकरेंची सभा या विविध घडामोडी या आठवड्यात घडल्या आहेत. पाहुयात या सर्व घटनांचा आढावा....

20 मार्च 2023

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. थोड्या वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. 

(वाचा सविस्तर :https://marathi.abplive.com/news/maharashtra/anil-jaisinghani-bookie-arrested-in-gujarat-by-mumbai-police-in-amruta-fadnavis-bribe-extortion-ransom-case-designer-aniksha-jaisinghani-maharashtra-1161286?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई: राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याने गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल असं आश्वासन सरकारने दिलं असल्याचं संपातील समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 

(वाचा सविस्तर : https://marathi.abplive.com/news/maharashtra/old-pension-scheme-govt-employees-strike-back-govt-positive-to-implement-old-pension-scheme-with-retrospective-effect-1161380?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


21 मार्च 2023

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  (Maharashtra Local Body Election) निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेले आहेत.  पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे.  ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे जात आहे. 
( वाचा सविस्तर :https://marathi.abplive.com/news/maharashtra/supreme-court-hearing-on-maharashtra-local-body-election-postponed-to-tuesday-1161565?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


22 मार्च 2023

गुढीपाडव्या निमित्ताने राज्यभरात शोभायात्रा

Gudi Padwa 2023 : राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. मराठी नववर्ष, गुढीपाडव्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. मुंबईसह ठाणे, पुणे, कोल्हापूर,नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला

(वाचा सविस्तर : https://marathi.abplive.com/news/maharashtra/gudi-padwa-2023-maharashtra-celebrates-gudi-padwa-and-marathi-new-year-with-traditional-1161946?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंच जाहीर वक्तव्य

Raj Thackeray : शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले. शिवसेनेचा धनुष्यबाण या गटाकडे की त्या गटाकडे हे पाहून त्रास झाला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (वाचा सविस्तर :https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-politics-mns-chief-raj-thackeray-first-reaction-on-uddhav-thackeray-and-eknath-shinde-conflict-on-shiv-sena-election-symbol-1161988)


नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याप्रकरणी मंगळुरुमधून तरुणी ताब्यात

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी दिल्याप्रकरणी मंगळुरुमधून एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलिसांची (Nagpur News)  एक टीम तातडीनं बेळगावला रवाना झाली आहे. (वाचा सविस्तर : https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-nitin-gadkari-threat-call-mangaluru-girl-arrested-for-threatening-nitin-gadkari-office-by-phone-1161879?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)
 
23 मार्च 2023

चार वर्षांनंतर टीम इंडियानं घरच्या मैदानावर गमावली एकदिवसीय मालिका 

IND vs AUS, ODI Series : गेल्या चार वर्षांत टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. पण घरच्या मैदानावर न हरण्याची ही मालिका शुक्रवारी रात्री (22 मार्च) खंडित झाली. ऑस्ट्रेलियाने चेपॉकमध्ये भारतीय संघाचा 21 धावांनी पराभव करत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकली,
(वाचा सविस्तर :
https://marathi.abplive.com/sports/cricket/team-indias-defeat-reasons-against-australia-in-odi-series-at-home-ind-vs-aus-odi-1162144)


 मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलं; राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा

Rahul gandhi: मोदी आडनावावरुन विनोद करणं राहुल गांधींना (Rahul Gandhi)  भोवलं  आहे.  2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना  दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सुरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. 

(वाचा सविस्तर:
https://marathi.abplive.com/news/india/rahul-gandhi-convicted-for-two-years-by-surat-court-for-defamation-for-all-thieves-have-modi-surname-1162092?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


राज ठाकरेंचं अल्टिमेटम, मजारीभोवतीचं बांधकाम हटवलं

Mahim Majar : माहिम (Mahim) समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम (Unauthorized construction) हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं (Mumbai Palika) अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. 
(वाचा सविस्तर:
https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-mumbai-news-mumbai-municipal-corporation-take-action-on-near-mahim-majar-unauthorized-construction-removed-1162075?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline) 


विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री

Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)  शेवटचा आठवडा सुरु आहे. आजच्या (23 मार्च) दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. 
(वाचा सविस्तर :
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-budget-session-uddhav-thackeray-and-dcm-devendra-fadnavis-entered-at-vidhan-bhavan-together-1162094?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांना हटवलं

Sanjay Raut : शिसवेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. 

(वाचा सविस्तर:
https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-eknath-shinde-remove-mp-sanjay-raut-from-post-leader-of-parliamentary-party-of-shivsena-1162136?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline) 


24 मार्च 2023

राहुल गांधींची खासदारकी रद्द

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सुरत न्यायालयाने त्यांना 23 मार्चला दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 
(वाचा सविस्तर :
https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-disqualified-as-mp-of-loksabha-for-modi-defamation-case-1162421?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


ईडी आणि सीबीआयविरोधात 14 विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव

देशातील विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांकडून होत असलेल्या कारवायांविरोधात विरोधी पक्षांनी सामूहिकपणे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका स्वीकारण्यात आली असून या याचिकेवर 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे. यापूर्वी विरोधी पक्षांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं आहे.
(वाचा सविस्तर :
https://marathi.abplive.com/news/india/supreme-court-on-agreed-to-hear-the-plea-of-group-of-opposition-parties-on-misuse-of-central-probe-agencies-1162434?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)

25 मार्च 2023

 विधानपरिषदेचे 125 तास तर विधानसभेचे 165 तास कामकाम

Maharashtra Assembly Budget Session : 27 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Assembly Budget Session) 25 मार्चला सांगता झाली. या अधिवेशनात विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मिनीट झाले. तर विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले.
(वाचा सविस्तर :
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-assembly-budget-session-125-hours-of-legislative-council-work-and-165-hours-of-legislative-assembly-work-1162805)


...म्हणून माझी खासदारकी रद्द, राहुल गांधींची पत्रकार परिषद

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 
(वाचा सविस्तर :
https://marathi.abplive.com/news/india/congress-leader-rahul-gandhi-press-conference-live-updates-rahul-gandhi-disqualified-as-mp-1162667?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)

 केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'गिफ्ट', LPG सिलेंडरवर सबसिडीची घोषणा

LPG Subsidy Ujjwala Yojana : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली ​आहे. 

(वाचा सविस्तर :https://marathi.abplive.com/business/lpg-subsidy-central-government-announces-subsidy-on-lpg-for-ujjwala-yojana-beneficiaries-1162589?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline)


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Embed widget