एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weather : सावधान! पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, 'या' भागात पडणार वादळी पाऊस

भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार  पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात चांगलाच बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण दिसत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार  पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसासोबतच वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात देखील विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून पावसाचा जोर दिसणार आहे. 

डिसेंबरमध्ये चक्रीवादळाची शक्यता

आजपासून पंधरा दिवसानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात (5 ते 6 डिसेंबर) बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची शक्यता आहे. बांगलादेशकडे त्याची वाटचाल राहू शकते. त्यामुळं महाराष्ट्राला त्याचा धोका नाही. सध्या एल निनो मध्यम तीव्रतेत आहे. मध्यम का असेना पण त्याचे अस्तित्व आहे. शिवाय पावसासाठी पूरक ठरत असतो तो धन आयओडी पुढील महिन्यात डिसेंबरअखेर नामशेष होण्याच्या मार्गांवर असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. तसेच एमजेओ सध्या फेज 2 मध्ये असून तो माघारी फिरुन 6 मध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरमधील चंपाषष्टी दरम्यान पडणाऱ्या पावसाची शक्यताही मावळली असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. 

दरवर्षी जशी थंडी असते तशीच थंडी उर्वरित नोव्हेंबर महिन्यात असेल. म्हणजेच थंडी असणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत 14 ते 16 डिग्री दरम्यान किमान तापमान असु शकते. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी कमी जाणवण्याची शक्यता आहे. खान्देशात थंडीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदल हा बंगालच्या उपसागरातून 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून  येणाऱ्या आणि तामिळनाडू केरळ राज्य ओलांडून पश्चिमकडे वाहणाऱ्या मजबूत ' पुर्वी वारा झोता ' तून वाहणारा हिवाळी मोसमी वाऱ्यामुळं महाराष्ट्रतही जाणवेल. 

महत्त्वाच्या बातम्या:

Weather : रब्बी पिकांना वरदान मिळणार का? कार्तिक एकादशी ते पौर्णिमा कसं असेल राज्यातील वातावरण; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesar : शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळा होण्यात तांत्रिक अडचणी - केसरकरMahayuti Seat Sharing : कसा असेल नव्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला?  ABP Majha कडे EXCLUSIVETop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 24 नोव्हेंबर  2024: ABP MajhaManoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्याला पाडलं, अमोल खताळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सुजय विखेंच्या पराभवाचा बदला...
Amol Khatal : 40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
40 वर्षांच्या एकहाती वर्चस्वाला हादरा, बाळासाहेब थोरातांचा पराभव करणारे 'जायंट किलर' अमोल खताळ नेमके कोण?
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
'हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..' विधानसभेच्या निकालानंतर मनोज जरांगे म्हणाले,'आमच्याशी बेईमानी कराल तर..'
Eknath Shinde Shivsena : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही पराभूत! व्हाया सुरत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा दणका, ते पाच आमदार कोण?
Ajit Pawar: मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मावळ पॅटर्न उद्ध्वस्त करणारे सुनील शेळके कसे जिंकले, मोदींसोबतच्या भेटीचा किस्सा दादांनी सांगितला, तटकरेंनी गालगुच्चा घेतला
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Embed widget