Maharashtra Weather : राज्यात वर्षअखेर पावसाची हजेरी, नवीन वर्षातही वरुणराजा बरसणार; हवामानात चढ-उतार कायम
IMD Weather Update : आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
![Maharashtra Weather : राज्यात वर्षअखेर पावसाची हजेरी, नवीन वर्षातही वरुणराजा बरसणार; हवामानात चढ-उतार कायम Maharashtra Weather Update Today imd predicts rain in maharashtra Rain prediction cold weather marathi news Maharashtra Weather : राज्यात वर्षअखेर पावसाची हजेरी, नवीन वर्षातही वरुणराजा बरसणार; हवामानात चढ-उतार कायम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/22/d648ae542b47b9f2e62a2eccaf1366e3170324167656578_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Weather Update Today : डिसेंबर महिना संपून नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे देशासह राज्यातील तापमानातही मोठी घट (Cold Weather) होताना दिसत आहे, दुसरीकडे हवामान खात्याने (IMD) पावसाची शक्यता वर्तवली आहे. वर्षअखेर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यासोबतच नवीन वर्षातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पावसाची शक्यता
वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाची (Rain Prediction) शक्यता आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाबमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान पूरग्रस्त तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूमधील पूर ओसरला असताना पुन्हा पावसाच्या शक्यतेमुळे नागरिक चिंतेत आहे. महाराष्ट्रासहगोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या ठिकाणी वर्षअखेर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता आहे.
हवामानात चढ-उतार कायम
राज्यातील तापमानात (Temperature) चढ-उतार पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) पसरली असून याचा परिणाम महाराष्ट्रावर (Maharashtra) दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीची लाट कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये सकाळी आणि रात्री तापमानात मोठी घसरण पाहायला मिळत आहे, तर दुपारच्या वेळी तापमानात किंचित वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं असेल?
राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 10 अंशाखाली राहण्याची शक्यता आहे. कोकणात देखील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकेल, असं आयएमडीने म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागात किमान तापमान 10 अंशांवर येणार आहे. पुण्यातही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हुडहुडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमानात घट होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
Weather Update : थंडीतही पावसाची रिमझिम, उत्तर भारतात हुडहुडी; IMD चा अंदाज काय सांगतो?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)