राज्यावर आस्मानी संकट, पाच दिवस पावसाची शक्यता,ज्वारीसह अनेक पिकांना धोका
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच पावसाच्या सरीही कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. दररोज उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे. तसेच पावसाच्या सरीही कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशभारत काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहू लागल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 7 ते 9 मार्च, दरम्यान महाराष्ट्र,गुजरात,पू.राजस्थान व प.मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात ढगाळ वातावरण,हलक्या पावसाची शक्यता. मराठवाडा,मध्य महाराष्ट्,विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उन्हाची तीव्रता कमी होणार -
तापमानात वाढ झाल्यामुळे राज्यात उन्हाच्या झळा जाणवत होत्या. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आता पावसाच्या सरी बरसल्यानंतर नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे. पण अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सध्या रब्बीचा हंगाम काढणीला आलेला आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडला होता. तसेच डिसेंबर महिन्यातही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी गारपीटही झाली होती.
Latest satellite obs at 2.30 pm indicating the position of deep depression over SW BoB.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 5, 2022
Interior of Maharashtra also isolated mod clouds are observed
5 days all India severe weather warning issued by IMD today. pic.twitter.com/HgnhWG13d5
महत्त्वाच्या इतर बातम्या :























