Maharashtra Weather Update: राज्यात आणखी चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा मुक्काम,IMD चे तीव्र इशारे
Maharashtra Weather Update: राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असून ठिकठिकाणी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.

Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग आहेत. बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा,गारपीट आणि मध्यम सरींच्या पावसाने हजेरी लावला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे ढग आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस राज्याला दणका देणार आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा यलो अलर्ट दिलाय. (Rain Alert) हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम वाढणार असून कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ठिकठिकाणी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
9 मे- पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,
पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड,जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
10 मे – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
11 मे – बहुतांश राज्यात पावसाचा येलो अलर्ट
12 मे – संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, तसेच मध्य महाराष्ट्रात – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5…… भेट घ्या. pic.twitter.com/PkoOrE4INs
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 9, 2025
यंदा मान्सूनही लवकर येणार
राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कताही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. यावर्षी देशभरात मोठ्या प्रमाणात उष्णता होती. 50 दिवसांपेक्षा जास्त दिवस यावर्षी उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळं हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापल्यानं बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळं देशभरात बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. परिणामी यंदा लवकर मान्सून येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
परभणीत स्विमिंग पूलमध्ये बुडुन 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; 3 तासानंतर मृतदेह शोधण्यास यश























