सावधान! आज राज्यात 'यलो अलर्ट', 'या' भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra Weather : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यात मान्सूनसाठी (Monsoon) पोषक अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
'या' भागात जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात हवामान खात्याकडून आज यलो अलर्ट जारी करण्यात आा आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनी पावसाच्या आधी सर्व कामे उरकून घ्यावीत, तसेत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात वादळी पाऊस, केळी पिकाचं मोठं नुकसान
सध्या राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. काल सायंकाळी व रात्री बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात झालेल्या वादळी पावसाने केळी पिकाचं मोठ नुकसान झालं आहे. शिवाय मान्सून पूर्व शेतीची मशागत ही थांबली आहे.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची हजेरी, पंजाबराव डख यांचा अंदाज काय सांगतो? वाचा