Maharashtra Weather Update: येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह राज्यभर पावसाचे हायअलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather Update: पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता आहे .मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे

Maharashtra weather update: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे .कोकणपट्टी तसेच मुंबई ठाणे व उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार होती . मुंबई ,ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जरी करण्यात आलाय .काल झालेल्या पावसामुळे विदर्भात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालंय . हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे .
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार अती मुसळधार पावसाची शक्यता आहे .पुढील 7 दिवस या भागात पावसाला पोषक स्थिती आहे . उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हांमध्ये पावसाचा तीव्र अलर्ट आहे .तर पुढील दोन दिवसांत मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .
काल रात्रीपासून विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय .पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता आहे .मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे .येत्या 24 तासात या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय .
कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट ?
तळ कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे .पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असून विविध ठिकाणी हायअलर्ट देण्यात आले आहेत .
28 जून: मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसर, व संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट
पुणे व सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट
29 जून : रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा व कोल्हापूर घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट
मुंबई ठाणे पालघर नाशिक घाटमाथासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
30 जून : रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा व पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
मुंबई ठाणे व सिंधुदुर्ग व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता
1 जुलै :तळ कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट ,रायगड कोल्हापूर पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता .संपूर्ण विदर्भात व मराठवाड्यातील हिंगोली परभणी व नांदेड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
हेही वाचा:
Maharashtra Monsoon Superfast News | मान्सूनच्या सुपरफास्ट बातम्या | 28 June 2025 | ABP Majha
























