Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा उद्रेक! उन्हाचा चटका असह्य ; अकोल्यात 43.2 अंश, आज कुठे काय स्थिती ?
राज्यात उष्णतेचा पारा प्रचंड वाढलाय. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन तज्ञांकडून करण्यात येत आहे. कुठे किती तापमान आहे? पुढे ३ दिवस कसे राहणार आहे? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: राज्यात कमाल तापमानाचा पारा प्रचंड वाढला आहे .दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी धडकी भरेल एवढ्या तापमान नोंदवलं जात आहे .गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर एक-दोन दिवस दिलासादायक स्थिती होती .मात्र आता तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं .आज राज्यात तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे .अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून 43 अंश सेल्सिअसचे नोंद होत आहे .आज 43.2 अंश तापमान नोंदवले गेले .संपूर्ण विदर्भात 40° च्या पुढे तापमान गेले .मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रचंड झळा बसतायत .कोकणात उष्ण व दमट तापमानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (IMD)
उद्यापासून हा अलर्ट आणखी तीव्र होणार असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडेही उष्णतेच्या लाटा सुरू होणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.दरम्यान नागपुरात आता महापालिका ही उष्णतेच्या या नोंदणीमुळे अलर्ट मोडवर आली आहे .उष्माघातापासून वाचण्यासाठी नागपूर महापालिकेने हीट ॲक्शन प्लॅन तयार केला असून शाळांच्या वेळा बदलण्यात आले आहेत .बेघरांना शेल्टर हाऊस आणि इतर हॉटस्पॉट भागांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे .

हवामान विभागाचा अंदाज काय ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती बंगालच्या उपसागरातच सक्रिय आहे .त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा इशारा आहे .आता अवकाळीच वादळ महाराष्ट्राकडून पुन्हा दक्षिणेकडे गेलंय .तर उत्तरेकडे नव्याने पश्चिमी चक्राबाद तयार होत आहे .त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . त्यामुळे दक्षिण आणि उत्तरेकडे अवकाळी पाऊस आणि महाराष्ट्रात उष्णतेचा कडेलोट होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत .येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे .सध्या बहुतांश ठिकाणी चाळिशीच्या वर तापमान जात असताना वाढत्या उष्णतेपासून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन तज्ञांकडून केले जात आहे .
आज कोणत्या भागात किती तापमान ?
आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र प्रचंड तापले असून अकोला 43.2 अमरावती 42.6 यवतमाळ 42.4 वर्धा 41.1 नागपूर 42.2 चंद्रपूर 42.6 गोंदिया 40.4 गडचिरोली 40.6 अंश सेल्सिअस अशा नोंदी झाल्या आहेत .जळगाव आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली .मराठवाड्यात आज सर्वाधिक तापमान परभणीत नोंदवले गेले .40.7°c तापमानाची नोंद आज परभणीत झाली आहे .छत्रपती संभाजी नगर 40 .2 अंशावर आहे . लातूर धाराशिव मध्ये 39 .2 अंश सेल्सिअस तापमान आहे .
मध्य महाराष्ट्र व कोकणही तापले
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ही सध्या प्रचंड तापमानाची नोंद होत आहे .पुण्यात आज 39.2 अंश सेल्सिअस तापमान होते .तर सोलापुरात 41.4 .नाशिक 40.2 सांगली कोल्हापूर सातारा 38 ते 38.5 अंश ठाणे पालघर 37 व 36 अंश सेल्सिअस वर होते .
हेही वाचा:























