एक्स्प्लोर

कुठे रिमझिम तर, कुठे मुसळधार; ठाणे, भिवंडी, सांगली, वाशिमसह धाराशिवमध्ये पावसाची हजेरी

Maharashtra Rain News : गेल्या 24 तासात कोकणासह, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे.

मुंबई : राज्यात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोकणासह, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain News) झाला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे. वाशिमच्या मालेगाव, रिसोड तालुक्यांमध्ये आज दुपारी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मुसळधार पडलेल्या पावसाच्या भागात जवळपास 50 टक्के खरीप पेरणी आटोपली होती. त्यामुळे आजचा पडलेला पाऊस शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

सांगलीत ढगफुटी सदृश्य पाऊस

सांगली जिल्ह्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. आंबेबनमळा येथे झाडाला  बांधलेली जनावरे पाण्यात बुडू लागली असताना शेतकऱ्यांने वेळीच धाव घेत जनावरांची सुटका केली. शेतकरी राजू चपणे यांनी कमरेइतक्या पाण्यात जात जनावरे सोडवून पाण्याच्या बाहेर काढत जनावरांचा जीव वाचवला.

जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ईटकुर गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी दिलीप गंभीरे यांच्या शेतातील बंद असलेल्या बोअरवेलमधून उडाले पाण्याचे उंच फवारे उडाले. धाराशिव, कळंब आणि वाशी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. तर धाराशिव तालुक्यातील सारोळा येथील बंधारा आणि नदी-नालेही तुडुंब भरले. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.

वसई-विरारमध्ये दुपारनंतर पावसाची हजेरी

वसई, विरार, नालासोपारा परिसरात दुपारनंतर पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अधून-मधून जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत आहे. हवेत गारवा निर्माण झाला असून,उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. परिसरात ढग दाटून आले आहेत तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या होणाऱ्या पाऊसामुळे शहरातील नागरिकन सह ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे.

भिवंडीत काही तासांचा पावसात भाजी मार्केटमध्ये साचले पाणी

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे दुपारनंतर भिवंडी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. भिवंडी शहरातील सखल भागात पावसामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाले असून शहरातील मुख्य बाजारपेठ आणि भाजी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली होती तर ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक गावात वीज पुरवठा खंडित करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget