(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Weather Report : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, तीन जिल्हे गारठले, निफाडमध्ये पारा 8.3 अंशावर
Maharashtra Weather Report : नाशकात निच्चांकी तापमानाची नोंद (Maharashtra Weather Report) झाली आहे, निफाडमध्ये पारा 8.3 अंशावर पोहोचलाय.
Maharashtra Weather Report : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढू लागलाय. नाशकात निच्चांकी तापमानाची नोंद (Maharashtra Weather Report) झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये पारा 8.3 अंशावर गेला आहे. याशिवाय पुणे आणि जेऊरमध्ये देखील तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी (Maharashtra Weather Report) वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे (Pune) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील काही तालुक्यात थंडी वाढलीये. जेऊरमध्येही पारा 9 वर पोहोचला आहे.
Today's Maharashtra Weather summary from 0830 to 1730 IST@Hosalikar_KS pic.twitter.com/MToSAwXHWN
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) November 27, 2024
आजचं किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
निफाड - 8.3
अहमदनगर- 9.4
सातारा - 12
नाशिक - 10.6
कोल्हापूर - 15.5
कुलाबा - 22
परभणी - 11.6
संभाजीनगर - 12.2
रत्नागिरी - 20.5
नांदेड - 12.3
उदगीर - 11.5
पुणे - 9.9
बारामती - 10.8
सांताक्रुज (मुंबई) - 17.6
माथेरान - 15.6
महाबळेश्वर- 11.8
जालना - 11.4
जेऊर - 9
जळगाव - 11.7
नागपूर - 11.7
गोंदिया - 11.9
अमरावती - 14.1
अकोला - 13.6
Maharashtra weather for next five days:@Hosalikar_KS pic.twitter.com/hnqChxI7Dg
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) November 27, 2024
शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील तापमान आणखी किमान तापमानाची नोंद होऊ शकते. राज्यात थंडीचा वाढता जोर पाहता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पिकाला जपण्यासाठी प्रयत्न करणे देखील महत्त्वाचे असणार आहे. पुढी काही आठवड्यांमध्ये कपाशी पिकावर तंबाखूची पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची जपवणूक करणे गरजेचे आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये पारा 8.3 अंशावर पोहोचला आहे. मुंबईपाठोपाठ नाशिक आणि निफाडचा पारा दोन अंशांनी घसरला आहे. नाशिकमध्ये आज 10.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद