महाराष्ट्रात थंडीची चाहूल, आता पाऊस पडणार का? कसं असेल राज्यातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते, अशी माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली ऐआहे.
Maharashtra Weather News : सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान कोकण मध्य महाराष्ट्रात सरासरी इतके तर विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा 2 डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे 33 डिग्री से. ग्रेड च्या आसपास असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, या काळात सध्या पावसाची शक्यता नसल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.
तसेच पहाटेचे किमान तापमान मात्र विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 4 डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे 21 डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणासहित अजुन ऑक्टोबर हिट चा परिणाम महाराष्ट्रात अजुन 3 ते 4 दिवस म्हणजे सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवत आहे.
पुढील पाच दिवस पहाटेचे किमान तापमानात अंदाजे 2 ते 3 डिग्री से. घटणार
वायव्यई व पूर्व भारतात, उद्यापासून पुढील पाच दिवस पहाटेचे किमान तापमानात अंदाजे 2 ते 3 डिग्री से. ग्रेड ने घट होण्याच्या शक्यतेमुळे, मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातही निरभ्र आकाशासहित पहाटेचे किमान तापमानात सध्यापेक्षा हळूहळू 5 डिग्री से.ग्रेड ने खालावून 15 ते 16 डिग्री से. ग्रेड पर्यन्त खाली घसरण होवु शकते, असे वाटते. त्यामुळं मंगळवार दिनाकं 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात जोरदार नव्हे पण हळूहळू थंडीची काहीशी अपेक्षा करू असे खुळे म्हणाले.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हळूहळू थंडी वाढत आहे. यावर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी नाले, धरणे भरली आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यात पाण्याचा साठा झालेला आहे. त्यामुळं यावर्षीची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा दणका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. दरम्यान, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला होता. राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, पावसाळ्याचे दिवस संपले तरीदेखील अनेक भागात पावसानं जोराचा दणका दिल्याचं पाहायला मिळालं होते. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाची शक्यता कमी असून हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे.