Maharashtra Weather : पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात तापमानाचा ( Temperature) पारा हा 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला आहे.
Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका (Cold Weather) तर कधी ढगाळ वातावरण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात तापमानाचा ( Temperature) पारा हा 15 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला आहे. सर्वात कमी तापमान हे उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रातीत तापमान हे 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दुसरीकडं मुंबईतही (Mumbai) हुडहुडी वाढली आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात थंडी पडली आहे. सध्या उत्तर भारतातही (North India) थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर काही ठिकाणी दाट धुके पडत आहे. वाढत्या थंडीमुळं शेकोट्या पेटल्या आहेत. गेल्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
पाहुयात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान
सोलापूर - 20.1 अंश सेल्सिअस
सातारा - 16.1 अंश सेल्सिअस
नांदेड - 19.08 अंश सेल्सिअस
औरंगाबाद - 13.02 अंश सेल्सिअस
कोल्हापूर - 20.05 अंश सेल्सिअस
परभणी - 18.06 अंश सेल्सिअस
उस्मानाबाद 19.04 अंश सेल्सिअस
पुणे - 15.03 अंश सेल्सिअस
जालना - 16 अंश सेल्सिअस
जळगाव 14 अंश सेल्सिअस
सांगली - 18.09 अंश सेल्सिअस
नाशिक - 11.9 अंश सेल्सिअस
मुंबई - 17.02 अंश सेल्सिअस
महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. रात्री कधी थंडीचा कडाका तर दिवसा उन्हाचा चटका जाणवत आहे. हळूहळू राज्यात थंडीत वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 11 ते 15 अंश सेल्सिअसच्या आसपास घसरला आहे. मुंबईसह नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमानात वेगानं घट होत आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्येही थंडीत चांगलीच वाढ झाली आहे.
देशाच्या राजधानीतही हुडहुडी वाढली
देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्यानं हुडहुडी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासात उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक वाढणार आहे. तसेच उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात दाट धुके पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच पूर्व राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्येही दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या: