विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार, विधानसभा नियम समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
विधीमंडळ अधिवेशनाच्या 22 डिसेंबरला पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी याला विरोध केला आहे.
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची (vidhansabha president) निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. विधानसभा नियम समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 22 डिसेंबरला विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्यांनी याला विरोध केला.
उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जातोय? असा मुद्दा भाजप सदस्यांनी बैठकीत आज उपस्थित केला.
22 डिसेंबला विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नियम बदलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवणार आहे. नियम समितीच्या बैठकीत भाजप सदस्य डॉ संदीप धुर्वे, जयकुमार गोरे, धनंजय गाडगीळ यांनी नियम बदलाला तीव्र विरोध केला. उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीबाबत गुप्त मतदानाची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्रात बदलण्यासाठी कोणतेही ठोस कारण नसताना हा निर्णय का घेतला जातोय ? असा मुद्दा भाजप सदस्यांनी बैठकीत आज उपस्थित केला.
महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवण्याचे काम करते, विधानसभेच्या अमृत महोत्सवी वर्षात हा नियम बदलण्यामागचे नेमके कारण काय असा सवालही भाजप सदस्यांनी उपस्थित केला. भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनादिवशी म्हणजे 6 जुलैला झालेल्या नियम समितीच्या बैठकीला भाजप सदस्यांना हेतुपुरस्सर न बोलावल्याचा आरोप देखील या वेळी केला.
या बैठकीत नियम बदलण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. नियम समितीच्या बैठकीत नियमबाह्य कृती केल्याचा गंभीर आरोप भाजप सदस्यांनी केला आहे. 22 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत चूक मान्य करताना ती अनावधानाने झाल्याचे उपाध्यक्षांनी या वेळी केला.
महाविकास आघाडीकडे एकूण संख्याबळ
- शिवसेना 56
- राष्ट्रवादी 53
- काँग्रेस 43
- क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1
- प्रहार 2
- बहुजन विकास आघाडी 3
- समाजवादी 2
- शेकाप 1
- माकप 1
- स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1
- अपक्ष 7
- एकूण- 171
- भाजप 106
- भाजप सहयोगी पक्ष आणि अपक्ष आमदार 7
- एकूण- 113
- तटस्थ आमदार
- एमआयएम- 2
- मनसे 1
- एकूण 3
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :