एक्स्प्लोर

'त्या' एका तासात विधानसभेत काय घडलं?, भाजपच्या 12 आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईची ‘टाईमलाईन’

अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.भाजपच्या 12 आमदारांवरच्या निलंबनाच्या कारवाईची ‘टाईमलाईन’...

मुंबई :  विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session)पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

Maharashtra Assembly Session 2021 : तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरणी भाजपचे 12 आमदार निलंबित

त्या एका तासात विधानसभेत काय घडलं?

भाजपच्या 12 आमदारांवरच्या निलंबनाच्या कारवाईची ‘टाईमलाईन’

•  ओबीसी आरक्षणसाठी  केंद्रानं ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, यासाठी राज्य सरकारने विधान सभेत ठराव मांडला.. याबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव पटलावर

• या ठरावात भाजप सरकारच्या काळात आणलेला अध्यादेश ,कोर्टाचे आदेश आणि केंद्राकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना इंपेरिकल डाटा मागवण्यात आला ,पत्र लिहिले गेले ही माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली

• मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितलं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

• या ठरावानं ओबीसींना आरक्षण मिळणार नाही; फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

• या इंपेरिकल डाटामध्ये चुका आहेत म्हणून दिला नाही फडणवीस यांनी केलं स्पष्ट

• यावर उत्तर देताना तुम्ही सत्तेत असताना काय केलं? केंद्र सरकारने तयार केलेल्या  जर या डेटा मध्ये चुका आहेत तर त्या दुरुस्त का नाही केल्या भुजबळ यांचा फडणवीस यांना सवाल

• अखेरीस विधानसभा अध्यक्षांनी हा ठराव मंजूर करण्यासाठी मतदानाला टाकला..पण भुजबळांनी केलेल्या आरोपावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू न दिल्याने भाजप आमदार आक्रमक 

• गिरीश महाजन तालिका अध्यक्षच्या खुर्चीसमोर आक्रमक होऊन बोलत होते

• ठराव मंजूर होत असताना संजय कुटे,रावल यांनी तालिका अध्यक्ष यांचा माईक खेचला 

• एक आमदाराने राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला

• आमदार आशिष शेलारमध्ये पडले. त्यांनी या आक्रमक आमदारांना हात धरून बाजूला केलं, थांबवलं..

• या गोंधळात ओबीसी आरक्षण साठी केंद्रानं इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव मंजूर

• ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानानं मंजूर; पण झालेल्या गोंधळामुळे  विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

• विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोलायला न दिल्यामुळे विरोधी पक्षाचे आमदार विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात.. दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित..भास्कर जाधव यांनी तिथे  दालनात आपल्याला धक्काबुक्की केल्याचे म्हटलं

• इतकंच नाहीतर काही आमदारांनी आई बहिणी वरून शिव्या घातल्याची माहिती सभागृहाला दिली

• सभागृहात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुकी झाली पण तेव्हा दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

• सभागृहात जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारे, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचं सभागृहात निवेदन

• तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी अखेरीस संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्ष निलंबनाची कारवाई

• विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग 

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget