एक्स्प्लोर

एका बाजूला वाढला तापमानाचा पारा, तर दुसऱ्या बाजूला अवकाळीचा मारा, राज्यातील शेतकरी चिंतेत

दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे.

Maharashtra Weather News : दिवसेंदिवस राज्यात तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. अकोला देशातील सर्वात उष्ण सहर ठरलं आहे. कारण तथं 44 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली आहे. तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यात देखील तापमानाचा पारा 42 ते 44 अंशावर गेला आहे. दरम्यान, असं असताना दुसऱ्या बाजूला राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. 

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात संध्याकाळी जवळपास 1 तास दमदार पाऊस झाला आहे. तर सोलापूर शहरात मागील 15 मिनिटापासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

वीज कोसळून तरुणाचा मृत्यू

सोलापुरात अवकाळी पावसावेळी वीज कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील आढेगाव इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे. विजय राजाराम डोंगरे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नााव आहे. सायंकाळी 7 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये जोरदार विजांचा कडकडाट ही सुरु होता.  त्याचवेळी बांधकामसाठी वाळूची ट्रक आल्याने विजय डोंगरे हा गाडी खाली करून घेण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक वातावरण खराब झाल्याने वीज कोसळली. यामुळे विजय डोंगरे हे गंभीर जखमी झाले, त्यांच्या नातेवाईकांनी मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आणलं होतं. मात्र डॉक्टरांनी उवचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र, पारा 41 अंशावर

अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असून तापमानाने 41 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. याचा परिणाम शिर्डी साई बाबा मंदिर परिसरातील भाविकांच्या संख्येवरही झाला असून, ती लक्षणीयरीत्या घटल्याचं दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भाविक दर्शनासाठी येणं टाळत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, साईबाबा संस्थानकडून भाविकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी जमिनीवर गालिचे अंथरण्यात आले आहेत. तसेच, रांगेत उभ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत येतात. मात्र, सध्या वाढलेल्या तापमानामुळे भाविकांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

विदर्भातील तापामानाचा पारा वाढला 

अकोला - 44.1
वर्धा - 44.4
नागपूर - 44
यवतमाळ- 42.8
गडचिरोली - 44
चंद्रपूर - 43.6
ब्रह्मपुरी - 43
गोंदिया - 42.9
भंडारा - 42
बुलढाणा - 41.2
अमरावती- 44.4

राज्यातील इतर शहरात किती तापमान?

सांगली 41.5
जलगांव 42.3
बारामती 40.3
परभणी 41.8
सतारा 40.8
एसएलपी 42.2
केएलपी 38.1
उदगीर 40.3
ज्यूर 41.5
मालेगांव 41
पुणे 40.3
छ.ग.संभाजी नगर 41.6
ठाणे 37
माथेरान 36
बीड 41.9
नासिक 38.4
नंदुरबार 39.3
अहिलायनगर 40.2
धाराशिव 41
जालना 40.7

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget