एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Tehsildar Strike : राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर

Maharashtra Tehsildar Strike : राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार आणि 600 तहसीलदार यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे.

Maharashtra Tehsildar Strike : राज्यभरातील 2200 नायब तहसीलदार (Naib Tehsildar) आणि 600 तहसीलदार (Tehsildar) यांनी आजपासून (3 एप्रिल) बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्यावरुन हा संप (Strike) पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे. 

दरम्यान राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे. वाढीव ग्रेड पे मागणी मान्य झाल्यास राज्यातील 2200 पेक्षा जास्त नायब तहसीलदारांना फायदा होईल तर दुसरीकडे सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्ष 2.64 कोटी रुपयांचा बोजा वाढेल. 

या बेमुदत संपामुळे राज्यभरातील तहसील कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळू शकतो. परंतु या आंदोलनामुळे राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडणार असून याचा फटका मात्र, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे. 

नेमक्या कुठल्या अडचणींना सामोरे जावे लागणार?

राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार हे संपावर गेल्याने याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाला बसणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कामही तहसीलदारांना करावे लागते. जमीन महसुलाची कामे, अतिवृष्टीचे पंचनामाचे, कारवाईची कामे, स्वस्त धान्य दुकानदारांवर देखरेख करुन काळाबाजार रोखणे, निवडणूक अधिकारी म्हणून तालुक्याची जबाबदारी पार पाडणे, तहसील कार्यालयातील विविध विभागातून दिले जाणारे दैनंदिन दाखले, सातबारा, फेरफार, उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, महसुली प्रकरणे, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान, गौण खनिज संदर्भातील कामे, रोजगार हमी योजनेची कामे, तालुक्यातील कामना प्रशासकीय मान्यता देणे, सेतू सुविधा, तालुका दंडाधिकारी स्वरुपाची कामे, जमीन महसूल जमीन नोंदी प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, पंचनामा,आरोपी ओळख परेड, रोजगार हमी योजनेचा इतर योजनांची अंमलबजावणी करणे, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे, कायद्याची पदवी न घेत अर्धन्यायिक जबाबदारी तालुका दंडाधिकारी म्हणून पार पाडणे, आदी जबाबदारी यांना करावी लागतात.

शेतकरी, सर्वसामान्य, विद्यार्थ्यांची परवड

नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सात दिवस संपत चालला होता. तर आता महसूल विभागाचे राजपत्रित अधिकारी असलेले तहसीलदार, नायब तहसीलदार हे बेमुदत काम बंद संपावर गेले आहेत. कर्मचारी अधिकारी यांच्यावर संपावर जाण्याची वेळ शासन का आणते? प्रलंबित मागण्यांवर शासन या आधीच तोडगा का काढत नाही? असा जरी प्रश्न असला तरी यात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी भरडले जात आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde FULL PC :  महायुतीत चांगला समन्वय; काळजीवाहू मुख्यमंत्री, सर्वांची काळजी घेतो- शिंदेDevendra Fadnavis Will Become Maharashtra New CM : ठरलं! देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारTop 80 At 8AM 29 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या  Maharashtra PoliticsABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9AM 29 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
निवडणूक संपताच मोठ्या हालचाली, मुंबईतील 50 हजार झोपड्यांच्या पुनवर्सनाचा प्लॅन, BMC ला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा?
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?  
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Embed widget