एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओला, उबेर टॅक्सींसाठी महाराष्ट्र टॅक्सी नियम लागू
मुंबई : ओला आणि उबेर टॅक्सीसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’ लागू करण्यात आला आहे. राज्यातील प्रवाशांना किफायतीशिर, तसेच सुरक्षित प्रवासाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाकडून अॅप आधारित टॅक्सी सर्व्हिसेसना नवीन नियमावली जाहीर केली आहे.
महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017 नुसार, ज्या शहरात ओला, उबेर टॅक्सींना व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी करणे अनिवार्य असेल. विशेष म्हणजे अॅपवर आधारित असा स्वतंत्र परवानाही देण्यात येणार आहे.
सरकारच्या नियमानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओला, उबेर टॅक्सींचं किमान आणि कमाल भाडं सरकार ठरवणार आहे.
‘महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’मुळे काय होईल?
- ज्या शहरात व्यवसाय करायचा असेल, त्याची नोंदणी आवश्यक
- अॅपवर आधारित टॅक्सी असा स्वतंत्र परवानाही देण्यात येईल. मात्र, या टॅक्सी वातानुकूलित असतील.
- या टॅक्सी स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या असतील.
- या टॅक्सीमध्ये किंवा टॅक्सीच्या वाहन चालकाकडे GPS/GPRS यंत्रणा असेल, तसेच टॅक्सीत अंतर, मार्ग आणि भाडे दर्शवणारा डिस्प्लेही असेल.
- सध्याच्या काळी-पिवळी टॅक्सीही अॅपवर आधारित टॅक्सी चालवता येईल. मात्र, गर्दीच्या वेळी अॅपवर आधारित आणि कमी गर्दीच्या वेळी मीटरवर, अशी टॅक्सी चालवता येणार नाही.
- प्रवासाचे भाडे सरकारकडून किमान आणि कमाल पद्धतनीने निश्चित करुन देण्यात येईल.
- टॅक्सीच्या स्वरुपानुसार भाड्याचे दर वेगवेगळे असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
भारत
Advertisement