एक्स्प्लोर

Maharashtra Talathi exam 2023 live updates: तलाठी भरती परीक्षेत सर्व्हर डाऊनचं विघ्न, लाखो परीक्षार्थींचा खोळंबा

Maharashtra Talathi exam 2023 live updates : तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत.

Key Events
Maharashtra Talathi exam 2023 live updates Talathi Bharti 2023 Maharashtra Talathi Recruitment 2023 complete Details Maharashtra Talathi exam 2023 live updates: तलाठी भरती परीक्षेत सर्व्हर डाऊनचं विघ्न, लाखो परीक्षार्थींचा खोळंबा
Maharashtra Talathi exam 2023 live updates

Background

Maharashtra Talathi exam 2023 live updates: सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे तलाठी भरती परीक्षा उशिराने सुरू झालीय. त्यामुळे पुढील दोन सत्रातील परीक्षाही दीड तास उशिराने सुरू होतील, अशी माहिती जमाबंदी आयुक्त अनिल रायते यांनी दिलीय. दुपारी साडेबारा वाजता सुरू होणारी परीक्षा आता दोन वाजता सुरू होणार आहे. तशी सूचना सर्व परीक्षा केंद्रांबाहेर लावण्यात आलीय. 

राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला. 

4 हजार 644 तलाठी पदांसाठी एकूण १० लाख ४१ हजार अर्ज आलेत. त्यामुळे लाखो उमेदवारांची सकाळपासून घालमेल सुरू होती. परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत व्हायला सुरुवात झालीय. सकाळी 9 ते 11 या वेळेत ही परीक्षा होती. मात्र अजूनही परीक्षा सुरू होऊ शकलेली नाही. 

गेले चार दिवस राज्यात तलाठी पदासाठीची ऑनलाईन परीक्षा सुरू आहे.रोज परीक्षा ही तीन सत्रांमध्ये  घेतली जाते. पहिले सत्र सकाळी 9 ते 11, दुसरे सत्र  दुपारी 12.30  ते 2.30 आणि तिसरे सत्र सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत होते. ऑनलाइन परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना सोडवावी लागते. राज्यभरात 17 लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी यंदा तलाठी पदासाठीच्या परीक्षेसाठी बसलेले आहे. त्यामुळे ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर अनेक दिवस घ्यावी लागत आहे. 

आज सकाळी ऑनलाइन परीक्षेसाठीचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पहिल्या सत्राची परीक्षा वेळेत सुरू झाली नाही. सकाळी 9. 40  वाजता जवळपास सर्व्हर सुरू झाल्याची माहिती आहे. सर्व परीक्षार्थी बसल्यानंतर मुंबईतून टीसीएसकडून सर्व संगणकांवर एकाच वेळी प्रश्नपत्रिका दिली जाते आणि तिथून दोन तास मोजले जातात नागपुरातील सर्व केंद्रांवर पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना ज्या वेळेस त्यांचा पेपर सुरू होईल तेव्हापासून पूर्ण दोन तासाचा कालावधी दिला जाईल असे सांगितले गेले. 

सकाळी परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत झाला आहे. 

13:50 PM (IST)  •  21 Aug 2023

Vikhe Patil: विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही : विखे पाटील  

Vikhe Patil: आजपासून राज्यातील 115 टीसीएस केंद्रावर भरतीची प्रक्रिया केली होती. डेटा सर्व्हर आहे त्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. पहिले सत्र 11 ते 1 करण्यात आले आहे. दुपारचे सत्र 2.30 ते 4.30 केले. सर्व परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी निवासी अधिकारी आहेत. विद्यार्थी परीक्षेपासून वंचीत राहणार नाही याची आम्ही काळजी घेतो. तांत्रिक बिघाड कशामुळे झाल्या याबाबत मुख्य सचिव माहिती घेत आहेत. मात्र कुणीही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी शासनाने घेतली आहे, असे विखे पाटील  म्हणाले.

13:44 PM (IST)  •  21 Aug 2023

Rohit Pawar: तलाठी पेपर फुटीवरून आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar: राज्यात सध्या सुरू असलेल्या तलाठी भरतीचे पेपर सातत्याने फुटत आहेत यावरून राष्ट्रवादीचे आ. रोहित पवारांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. सातत्याने पेपर फुटत असल्याने सरकारमधीलच एखादा नेता या पेपरफुटीमागे आहे का? असं आमदार रोहित पवारांनी म्हंटलंय.सोबतच विद्यार्थ्यांकडून एक हजार रुपये ऐवजी शंभर रुपये फी घ्यावी तसेच ज्या जिल्ह्यातील उमेदवार आहे त्याच जिल्ह्यात पेपर घ्यावेत, अनेकांना बाहेरचे जिल्हे मिळाल्याने ते उमेदवार पेपरला वेळेत पोहचू शकले नाहीत असं रोहित पवारांनी म्हंटलंय. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget