एक्स्प्लोर

Maharashtra Suicide Cases : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या; देशात दर तासाला 19 आत्महत्या; गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य

NCRB Report on Suicide : महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे.

Suicide Cases in Maharashtra : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातच एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 19,834 लोकांनी आत्महत्या केल्या आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमूळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB Report) अहवालातून ही धक्कादायक आणि लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.

दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 1941 आत्महत्या झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. त्यानंतर कर्नाटकात 1335 आणि आंध्र प्रदेशात 815 जणांनी दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. राज्यात बेरोजगारीमुळे 642, गरिबीमुळे 402 आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे 640 नागरीकांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. 

कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त

राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास 6961 आत्महत्या झाल्याचं अहवाल सांगतो. महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी 49.3 टक्के आत्महत्या झाल्याचं धक्कादायक वास्तवही समोर आलं आहे.

देशात दर तासाला 19 आत्महत्या 

2021 मध्ये 1,64,033 आत्महत्या झाल्या होत्या तर, 2022 मध्ये 1,70,924 आत्महत्या झाल्या. यापैकी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात 13.3 टक्के, तामिळनाडूमध्ये 11.6 टक्के, मध्य प्रदेश नऊ, कर्नाटक आठ आणि पश्चिम बंगालमध्ये 7.4 टक्के नोंदल्या गेल्या आहेत. आकडेवारीच्या दृष्टिकोनातून गणना केली तर 2022 मध्ये देशात दर तासाला 19 लोक आत्महत्या करतील. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात.

गंभीर आजारही आत्महत्येचं कारण

देशभरातील 18.4 टक्के आत्महत्यांमागे गंभीर आजार हे कारण होते. 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम आणि गोवा या राज्यांमध्ये रोगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
Santosh Deshmukh Case: एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
एसआयटीचा प्रमुख अन् दोन बड्या वकिलांची नावं सांगितली, मस्साजोगच्या गावकऱ्यांच्या 5 मागण्या, संक्रातीला टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा
Embed widget