एक्स्प्लोर

Maharashtra Break The Chain | राज्यात आजपासून कठोर निर्बंध

Maharashtra Break The Chain : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. राज्यात आजपासून सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. याशिवाय आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल.

LIVE

Key Events
Maharashtra Break The Chain | राज्यात आजपासून कठोर निर्बंध

Background

मुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार म्हणजेच आज 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरुच राहील. मात्र, खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

यापुढे या आदेशांना 'मिशन बिगीन अगेन' ऐवजी  'ब्रेक द चेन' असे संबोधण्यात येईल. यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे: 
 
शेतीविषयक कामे सुरु
 शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरु राहील. 
 
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.  
 
बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते 

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे 

सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरुच
- सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरुच राहिल. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करु शकतील. 
- सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.  
- बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे. 

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
- खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहिल. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरु राहतील

शासकीय कार्यालये- 50 टक्के उपस्थितीत
- शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहिल.
- शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल

मनोरंजन, सलून्स बंद
मनोरंजन आणि करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. 

प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी  बंद
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरुन येणारे भक्त आणि दर्शनार्थीसाठी बंद राहतील. मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यावे  

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यंगतांसाठीच सुरु ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहील

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल

ई कॉमर्स सेवा सुरु
- ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरुच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
- सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या  कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे 

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
- वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करुन घ्यावे 
- शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र दहावी आणि बारावी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील. 

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरु
- उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
- चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करु नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल. 
 
आजारी कामगाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरु असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे 

तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट
पाच पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

13:49 PM (IST)  •  05 Apr 2021

आज रात्री आठ वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद

राज्यातील लागू केलेल्या निर्बंधामुळे आज रात्री आठ वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मंदिरे बंद राहणार आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही कोरोना रुग्णाला बेड मिळणार नाही असं होणार नाही असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आजूबाजूच्या तीन ते चार जिल्ह्यातील कोरोना रुग्ण उपचारासाठी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत.

13:46 PM (IST)  •  05 Apr 2021

निर्बंधाविरोधात पुण्यातील सलून व्यावसायिक रस्त्यावर, असहकार आंदोलनाचा इशारा

 

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच 'ब्रेक द चेन' अंतर्गत काही नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध करत पुण्यातील सलून व्यवसायिक रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील वाघोली येथे सलून असोसिएशनची एक बैठक पार पडली असून या बैठकीनंतर राज्यातील सर्व सलून बंद न  ठेवण्याचा निर्णय सलून व्यावसायिकांनी घेतला आहे. सलूनची दुकाने उघडी ठेवून असहकार आंदोलन करण्याचे सलून असोसिएशनच्या बैठकीत ठरले आहे. 

13:30 PM (IST)  •  05 Apr 2021

कोल्हापुरातही कडक निर्बंधांविरोधात व्यापारी आक्रमक, कोणतेही नियम लावून घेणार नाही

कोल्हापुरातही कडक निर्बंधाविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारचे कुठलेही नियम लावून घेणार नाही असा इशारा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने सरकारला दिला आहे. उद्यापासून जिल्ह्यातील सगळी दुकाने सुरु राहणार आहे. दुकाने बंद ठेवली तर जीवनावश्यक वस्तू आणि मेडिकल देखील बंद ठेवू. प्रशासन येऊन कुलूप घालू देत पण आम्ही दुकान बंद करणार नाही, असा पवित्रा चेंबर ऑफ कॉमर्सने दिला आहे. सोबतच कडक निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असंही चेंबर ऑफ कॉमर्सचं म्हणणं आहे.

13:22 PM (IST)  •  05 Apr 2021

कठोर निर्बंधाविरोधात पुण्यातील सलून व्यावसायिक रस्त्यावर, असहकार आंदोलनाचा इशारा

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील सलून आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाला विरोध करत पुण्यातील सलून व्यवसायिक रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील वाघोली येथे सलून असोसिएशनची एक बैठक पार पडली असून या बैठकीनंतर राज्यातील सर्व सलून बंद न ठेवण्याचा निर्णय सलून व्यावसायिकांनी घेतला आहे. सलूनची उघडी ठेवून असहकार आंदोलन करण्याचे सलून असोसिएशनच्या बैठकीत ठरले आहे. 

13:02 PM (IST)  •  05 Apr 2021

विठुराया पुन्हा कुलूपबंद, आज सायंकाळपासून मंदिराला कुलुपे लागणार

कोरोनाचे संकट पुन्हा वाढल्याने मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लागू केले आणि त्यानुसार पुन्हा मंदिरे बंद करण्याचा निर्णय झाला. यानुसार आज सायंकाळी सात वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत विठुराया पुन्हा भाविकांसाठी कुलूपबंद होणार आहे. देवाचे नित्योपचार मात्र नियमितपणे सुरु राहणार आहेत. आज शेवटच्या दिवशी देवाचे दर्शन मिळावे याकरता ऑनलाईन बुकिंग करुन भाविक दर्शन रांगेत आले असून सायंकाळी सात वाजता मंदिराला कुलुपे घातली जाणार आहेत. येत्या 13 एप्रिल रोजी गुढीपाडवा देखील देवाला भाविकाविना साजरा करावा लागणार आहे. नवीन मराठी वर्षाचा आरंभ याही वर्षी भाविकांना विठुरायाच्या दर्शनाविनाच करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्बंधानंतर मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी इतर सदस्यांशी चर्चा करुन आज सायंकाळपासून मंदिर भाविकांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आता कोरोनाचे संकट वेळीच कमी नाही झाले तर गेल्यावर्षी प्रमाणे हे निर्बंध अजून किती दिवस वाढणार याची चिंता भाविकांना लागली असून तोपर्यंत भक्ताला देवाचा आणि देवाला भक्तांचा विरह सहन करावा लागणार आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Embed widget