एक्स्प्लोर

Jejuri Shashan Aplya Dari : जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचा अखेर मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार कार्यक्रम

जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचा अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या 23 जुलैला पुरंदर तालुक्यातील जेजुरीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यापूर्वी तीन वेळा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

Jejuri Shashan Aplya Dari : जेजुरीतील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचा (Shashan Aplya Dari ) अखेर मुहूर्त लागला आहे. येत्या 23 जुलैला पुरंदर तालुक्यातील जेजुरीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यापूर्वी तीन वेळा हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे रद्द करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' आणि जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आणि अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत. वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून 23 जुलै रोजी पहाटे 5 वाजेपासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गआणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड आणि इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. 

कोणते मार्ग सुरु कोणते बंद?

-जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड आणि इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक 65वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत.

- पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक: 

बारामती आणि  नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड आणि इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.  

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक: 

पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे. वाहतुकीस लावलेले निर्बंध  23  जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हे ही वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget