एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Maharashtra Board Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार 10 मिनिटांचा जास्त वेळ

विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत  पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे.

पुणे : दहावी (SSC Exam)  आणि बारावी बोर्ड परीक्षा (HSC Exam)  देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये  परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा देणाऱ्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्याथ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते.  परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल इाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत  पालक, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दिली जाणार आहेत. गेल्या वर्षी देखील वेळ वाढवून देण्यात येत आहे.

सकाळ सत्रात स. 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक

फेब्रुवारी-मार्च 2024  परीक्षांचा वेळी ही सकाळ सत्रात सकाळी 11.00  वाजता तसेच दुपार सत्रात दु.3.00 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात स. 10.30 वाजता तसेच दुपार सत्रात दु. 2.30  वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येणार (HSC- SSC Exam Schedule) 

परीक्षेचा सध्याचा वेळ

परीक्षेची सुधारीत वेळ

 सकाळी 11 ते दुपारी 2 

सकाळी 11 ते दुपारी 2:10

 सकाळी 11 ते दुपारी 1

 सकाळी 11 ते 1:10 

सकाळी 11 ते दुपारी 1.30

सकाळी 11 ते दुपारी 1.40

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.  फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणा आहे. 

हे ही वाचा :

MPSC Merit List : दुपारी मुलाखत, संध्याकाळी 'गुड न्यूज', राज्यसेवेची मेरिट लिस्ट जाहीर, विनायक पाटील राज्यात पहिला, पूजा वंजारीची मुलींमध्ये बाजी

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravikant Tupkar Buldhana EXIT Poll : दोन दिवस वाट बघा, बुलढाण्यात शेतकरी - जनता विजयी होणारBajrang Sonawane Beed Exit Poll : जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा झाला,बीडमधून मी 100% निवडून येणारRaksha Khadse Raver Lok Sabha Exit Poll : रावेर लोकसभेत एक ते दीड लाख मतांचा लीड मिळणारArunachal Pradesh : अरुणाचल प्रदशेमध्ये भाजपचा दणदणीत विजय, 42 जागांवर मारली बाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
एक्झिट पोलचा आधार ईव्हीएम नाही, तर जिल्हाधिकारी; लोकशक्तीपेक्षा मोठी ताकद नाही, हे प्रशासनाने लक्षात ठेवा; माजी मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
कळंबा जेलमध्ये 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा निर्घृण खून; जेलमध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरुच
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Embed widget