एक्स्प्लोर

राज्याचा मागास आयोग मराठवाड्याच्या तीन दिवसाचा दौऱ्यावर, वाईंदेशी मराठा समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार

मराठवाड्यातील सुमारे सात लाख वाईंदेशी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. म्हणून दोन वर्षांपूर्वी राज्य मागास आयोगाने जालना जिल्ह्यात सर्वेक्षणही केलं होतं. 

धाराशिव मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मागास आयोग उद्यापासून तीन दिवसांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात आयोग वाईंदेशी मराठा समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहे. पानिपत, राक्षसभुवनच्या लढाईसह एकूण चार लढाया लढलेल्या या मराठा समुहाला कुणबी प्रमाणपत्र हवंय. पानिपतच्या युद्धातून पराभूत झाल्यानंतर परतीच्या प्रवासात हा समाज विदर्भातल्या काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातल्या जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत स्थायिक झाला. हा समाज वाईंदेशी समाज म्हणून ओळखला जातो. दरम्यान, मराठवाड्यातील सुमारे सात लाख वाईंदेशी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. म्हणून दोन वर्षांपूर्वी राज्य मागास आयोगाने जालना जिल्ह्यात सर्वेक्षणही केलं होतं. 

वाईंदेशी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष राम सावंत म्हणाले, मराठवाड्यात वाईंदेशी कुणबी नावाचा समाज आहे. वाई प्रांतातून पानिपतच्या युद्धात हा समाज मराठवाड्यात स्थायिक झाला. हा समाज शेतकरी आहे. कुणबी समाजाच्या उपजातीमध्ये वाईंदेशी समाजाचा उल्लेख आहे.मराठवाड्याबरोबर विदर्भात देखील वाईंदेशी कुणबी आहे.  

वाईंदेशी समाजाच्या काय मागण्या आहेत?

  • मराठवाड्यातल्या सुमारे सात लाख मराठा समुहाची कुणबी प्रमाणपत्राची आयोगाकडे मागणी 
  • पाच वर्षापासून मागणी संघारजे
  • आयोगाने या मागणीवर विचार करत दोन वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण घेतले 
  • पुढच्या टप्प्यामध्ये वाईंदेशी मराठा कुणबी समाजाची सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोग मराठवाडा जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर
  • वाईंदिशी मराठा कुणबी समाजाचे सदस्य आयोगाला भेटणार 
  • या समाजाची मागणी किती मराठा असूनही त्यांच्या आर्थिक स्थिती खालावलेली आहे

विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे, यासाठी नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने आठवडाभरात याबाबतचा अंतिम अहवाल द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा निजामशाही सरकारच्या अखत्यारीत असताना महसुली कागदपत्रांच्या नोंदीवर जातीचा उल्लेख करण्यात येत होता.  जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा हैदराबादचा निजाम आणि त्याची राजवट चर्चेत आली आहे.

 मराठवाडा विभागात मिळून 8550 गावे आहेत. आठ जिल्ह्यातील 80 हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत.

कोणत्या जिल्ह्यांत आढळले पुरावे ?

  • औरंगाबाद : औरंगाबाद, पैठण, कन्नड, फुलंब्री, गंगापूर १९५१ पासून पुढील दस्तांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे आढळत आहेत. 
  • नांदेड : किनवट, माहूर, हदगाव बीड : पाटोदा, शिखर कासार, आष्टी 
  • उस्मानाबाद : उमरगा
  • जालना : घनसावंगी, भोकरदन जाफ्राबाद, बदनापूर, जालना, अंबड  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget