एक्स्प्लोर

Corona Lockdown | लॉकडाऊनमध्ये तळकोकणात महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' शेकरूची शिकार, दोन शेकरू गोळ्या घालून ठार

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वन्यजीव सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबई : देशात लॉकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडूनही वन विभागाने या प्राण्यांची शिकार केलेल्या शिकाऱ्यास अटक केलेली नाही. लॉकडाऊनमुळे न्यायालय बंद असल्याचे कारण पुढे करुन अधिकारी शिकाऱ्याला अटक करण्यास चाल ढकल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत शेकरूला वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले असून तो महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वन्यजीव सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र व्हॉटसअॅप स्टेटस एबीपी माझ्याच्या हाती लागले आहे. ही घटना 1 ते 3 एप्रिल दरम्यान घडली असून शिकाऱ्याचे नाव लिलाधर वराडकर असल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने माहिती दिली. शिकाऱ्याने बंदुकीच्या साहाय्याने दोन शेकरुंना ठार केले. त्यानंतर मृत शेकरुसोबत छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर टाकले.

वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत शेकरु या प्राण्याला संरक्षण लाभले आहे. प्रथम श्रेणीतील प्राण्यांची शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. सावंतवाडीत घडलेल्या या प्रकरणाची माहिती 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग वन विभागाला देण्यात आली. मात्र अद्याप शिकाऱ्याला वन विभागाने अटक केली.

शेकरु हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात शेखरु आढळतो. आंबा, काजू, फणस ही फळ खाऊन याच झाडांवर शेकरुला राहायला आवडते. सिंधुदुर्ग जिल्हा वनविभागाने माझाच्या बातमीनंतर तात्काळ अटक करत त्याला व्यायालयात हजर केले जाणार आहे

Coronavirus | Lockdownमधून शेती, मत्स्य शेतीला सूट; गृहमंत्रालयाकडून नव्या सूचना

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 08 July 2024 Marathi NewsChembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलंThane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबलेHarbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
Kalki 2898 AD OTT Release : रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
रिलीजच्या काही दिवसातच ओटीटीवर झळकणार 'कल्की 2898 एडी'; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय आर्थिक गर्तेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय मरणासन्न अवस्थेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Embed widget