एक्स्प्लोर

Mumbai Lockdown | लॉकडाऊनमुळे मुंबईत गुन्हेगारीचं प्रमाण कमालीचं घटलं!

कोरोनाची दहशत सध्या सगळीकडे माजली आहे. महाराष्ट्रात खासकरुन मुंबईत कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक आहे.यामुळं केलेल्या लॉकडाऊनमुळं मुंबईत क्राईम रेट कमालीचा घटला आहे.

मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्यात मुंबईत एकूण 1100  एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात 3368 एफआयआर नोंदविण्यात आल्या होत्या. या 1100 प्रकरणांमध्ये बहुतांश घटनांमध्ये कलम 188 चे उल्लंघन करण्याची प्रकरणं आहेत म्हणजे लाॅकडाऊनचं उल्लंघन.  2019 मध्ये एकूण 41933 गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील बहुतांश चोरीचे होते.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात एकूण 484 चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या, परंतु यावर्षी मार्च महिन्यात ही प्रकरणे जवळजवळ शून्य आहेत. तज्ञांच्या मते, याची दोन कारणे आहेत. चोरण्यासाठी गर्दीची जागा लागते, गर्दीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स, बॅग सारखी चोरी करणं सोपं असतं.  परंतु लाॅकडाऊनमुळे गर्दी नाही ज्यामुळे चोरी करणं शक्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर घरफोडीची प्रकरणं अधिक असतात पण लॉकडाऊनमुळे लोक आपल्या घरात आहेत आणि अशा परिस्थितीत चोरांना चोरी करणे शक्य होत नाही.
मार्च महिन्याआधी स्ट्रीट क्राईम म्हणजे चैन स्नॅचिंग, रस्त्यावरील भांडणे, खून, चोरी, अपघात इत्यादी अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत.  पण आता लोक रस्त्यावरच येत नसल्यामुळे अशा  प्रकारच्या गुन्हेगारीत मोठी घट आहे.
लाॅकडाऊनच उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस सध्या कठोर कारवाई करत आहेत. त्यामुळे घटलेल्या क्राईम रेटमुळे पोलिसांना देखील कोरोना लॉकडाऊनमध्ये मोठी मदत मिळत आहे, तर छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अटक देखील पुढे ढकलत आहेत. तसेच सध्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रकरणांव्यतिरिक्त लोकांच्या जामिनाला विरोध ही करत नसल्याचं चित्र आहे.
एकूणच मुंबईसारख्या महानगरात रोजच्या गर्दीमुळं गुन्हेगारीचं प्रमाण अधिक पाहायला मिळतं. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं चोऱ्यांचं प्रमाण देखील नगण्य आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल  
मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
संजय राऊतांचे FDA च्या अधिकाऱ्यांवर धक्कादायक आरोप, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले तुमच्याकडे...
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी स्नान, महिलेच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळला; लाखो रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल
Gold : दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
दुबईत सोनं भारतापेक्षा महाग की स्वस्त, दुबईतून किती ग्रॅम सोनं कोणताही कर न देता आणता येतं? 
Ketan Agrawal and Siya Goyal : वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
वाढदिवसाला सरप्राइज द्यायला पाठीवर SIYA नावाचा टॅटू काढला; साखरपुड्याला 28 ड्रेस अन् दागिन्यांचे सेट, केतनने सियासाठी काय-काय केलं?
Embed widget