एक्स्प्लोर

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ, वाचा नियमावली

SSC HSC Exam 2022 : यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

SSC HSC Exam 2022 :  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन (Offilne) होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ देण्यात येणार आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत या संबंधित माहिती दिली आहे. यंदा आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या 14 लाख 72 हजार 562 विद्यार्थ्यांची नोंदणी तर दहावीच्या 16 लाख 25 हजार 311 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.

दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठीची नियमावली काय आहे जाणून घ्या.

पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ
यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 ते 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी सवलत
परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल.

परीक्षार्थींना लसीकरण बंधनकारक नाही
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचं बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे. राज्यात दहावी आणि बारावीच्या 60 ते 65 टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.

परीक्षा केंद्र आणि व्यवस्था
परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल. शाळेत अधिक विद्यार्थ्यी असल्याचं त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.

अशी आहे नियमावली

* यावेळेस  प्रॅक्टीकल आणि तोंडी परिक्षा देण्यासाठी दोन संधी असतील.  पहिली संधी 14 फेब्रुवारी 3 मार्च दरम्यान असेल . या कालावधीत जे विद्यार्थ्यांकडून लेखी आणि तोंडी परिक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना 31 मार्च ते18 एप्रिल दरम्यान पुन्हा या परिक्षा देण्याची संधी. 
* दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा देण्याची दोन वेळेस संधी. 
* पहिली संधी 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान असेल. 
* यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याचा सराव कमी झाल्याने हा पेपर निर्णय. 
* जी प्रश्नपत्रिका 40 ते 60 गुणांची आहे त्यासाठी 15 मिनिटे अतिरिक्त मिळणार तर 70 गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक मिळणार.
* जे विद्यार्थी लेखी परीक्षेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांनाही जुलैच्या आसपास पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी. 
* दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची वेळ आल्यास नव्याने शुल्क भरावे लागणार नाही.
* तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही.  
* परीक्षेनंतर 40 ते 45 दिवसांमधे निकाल लावण्यात येणार. 
* जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते.
* परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त 25 विद्यार्थी असतील आणि  ते झिग-झ्याग पद्धतीने बसतील.
* परीक्षा केंद्र हे विद्यार्थ्यांच्या शाळेतच असेल. परीक्षा देण्यासाठी इतरत्र जावे लागणार नाही.
* प्रॅक्टिकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक बहीस्थ परीक्षक म्हणून यावेळेस नसतील, तर  त्याच शाळेतील  शिक्षक अंत्यस्थ आणि बहीस्थ परीक्षक म्हणून काम करतील. 
* मुख्य परीक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.
* दहावी आणि 12 वीच्या या परीक्षा एकूण अभ्यासक्रमाच्या 75 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात येतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget