RanjitSinh Disale Live updates : ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना लोकल मनस्ताप! वाचा प्रत्येक अपडेट

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांची सध्या खूप चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर काही आरोप केले आहेत. त्यावर गुरुजींनीही आपली बाजू मांडलीय. पाहा प्रत्येक अपडेट

abp majha web team Last Updated: 22 Jan 2022 01:01 PM
रणजितसिंह डिसले यांना परवानगी देण्यासाठी शिक्षण विभाग आज आणि उद्या सुरू राहणार

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परवानगी देण्यासाठी शिक्षण विभाग आज आणि उद्या ही चालू राहणार आहे. उद्या रविवारी सुट्टी असली तरी विभाग सुरू राहणार आहे. 

सोलापूरच्या शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा, डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला की नाही याची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची टीम नियुक्त

सोलापूरच्या शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा, डिसले यांना खरंच ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाला की नाही याची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची टीम नियुक्त करून त्याची चौकशी केली

त्या चौकशी अहवालात रणजित डिसले यांनी पुरस्काराची तपशील दिले नाहीत म्हणून कारवाई करा असा अहवाल शिक्षण विभागाला दिला

परितेवाडीच्या शाळेवर जाऊन पाच सदस्यीय सदस्याने दोन तास डिसले यांची चौकशी केली

रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग मोकळा

डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

https://marathi.abplive.com/news/maharashtra/ranjitsinh-disale-news-education-minister-varsha-gaikwad-directs-solapur-zp-ceo-to-go-abroad-for-disale-guruji-s-scholarship-1027457

आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जातेय -चंद्रकात पाटील

चंद्रकात पाटील म्हणाले,  राज्यात कशाचा पत्ता कशालाच नाही, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जातेय, ज्यांनी चांगल काम केलं त्यांचं पुढे काय झाल हे ही माहिती नसतं. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली तर ते नोकरी सोडतीलच.

माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचंय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

माझं सीईओंशी बोलणं झालं आहे, त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक परवानगी दिली जावी, त्यांना परदेशात पाठवायचंय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 

अभिनेते सयाजी शिंदे यांचा डिसले गुरुजींना पाठिंबा, डिसले गुरुजींवरील आरोप हे हास्यास्पद

अभिनेते सयाजी शिंदे यांचा डिसले गुरुजींना पाठिंबा, सयाजी शिंदे म्हणाले, डिसलेंसारखा माणूस महाराष्ट्राची शान आहे. त्यांच्यावर कारवाई करु नये. शिक्षण विभागानं यावर योग्य भूमिका घेऊन कारवाई करावी. त्यांच्या हेतू आणि उद्देशांवर शंका घेऊ नये. त्यांना ही फेलोशिप मिळायला हवी. बच्चू कडू यांना त्यांच्या स्टाईलसाठी ओळखलं जातं. त्यांनी डिसलेंना न्याय द्यावा. डिसलेंवरील आरोप हे हास्यास्पद आहेत. त्यांचे मोठेपण नाकारता येणार नाही. प्रशासनानं नीट अभ्यास करावा. अधिकाऱ्यांचा गैरसमज असेल किंवा त्यांची तेवढी कुवत नसेल. त्यांनी हे समजून घ्यावं आणि कार्यवाही करावी, असं सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून यावर मार्ग काढावा. गुरुजींना पुढील शिक्षण मिळावं त्याचा फायदा आपल्याला व्हावा. मी स्वत: बच्चू कडू यांना फोन केला आहे. त्यांनी यात लक्ष घालणार असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक विभागात असे अधिकारी आहेत, त्यावर न बोललेलंच बरं, असंही शिंदे म्हणाले. डिसले यांना नामोहरम कऱण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणाले. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. असा शिक्षक ज्यानं जागतिक स्तरावर आपलं नाव कोरलं त्याच्यावर ही वेळ आणली आहे, हे फार दुर्दैवी आहे, असंही सयाजी शिंदे म्हणाले. आपल्या देशात शिक्षणसंस्थामध्ये काय प्रकार चालतात हे आपल्याला माहिती आहे. हा माणूस किती जबरदस्त काम करत आहेत, ते आपल्याला माहिती आहे, असंही ते म्हणाले. 

Disale Guruji : डिसले गुरूजी गेली 3 वर्ष शाळेत अनुपस्थित, शिक्षण अधिकारी Kiran Lohar यांचे आरोप

Disale Guruji : डिसले गुरूजी गेली 3 वर्ष शाळेत अनुपस्थित, शिक्षण अधिकारी Kiran Lohar यांचे आरोप

Disale Guruji : काय आहेत रणजितसिंह डिसले गुरुजींवर शिक्षणाधिकाऱ्यांचे आरोप ?
रणजितसिंह डिसले गुरुजींना मिळालेली FulBright Scholarship म्हणजे काय ? कोणाला मिळते ही Scholarship

रणजितसिंह डिसले गुरुजींना मिळालेली FulBright Scholarship म्हणजे काय ? कोणाला मिळते ही Scholarship

Disle Guruji : डिसले गुरूजींबाबत खासदार Sanjay Raut शिक्षणमंत्र्यांशी बोलणार :ABP Majha

Disle Guruji : डिसले गुरूजींबाबत खासदार Sanjay Raut शिक्षणमंत्र्यांशी बोलणार :ABP Majha

डिसले गुरुजींवर काय आहेत आरोप

रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट  स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे.  याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं 

काय म्हणाले रणजितसिंह डिसले?

रणजितसिंह डिसले Abp Majha सोबत बोलताना म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मानसिक त्रास झाला. जेवणावळी कराव्या अशी मागणी केली गेली.  ते म्हणाले की, 25 जानेवारीला फुलब्राईटसाठी अंतिम कागदपत्रे दाखल करायची आहेत.14  डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता, त्यावर अद्याप निर्णय नाही.  फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. 

डिसले म्हणाले की, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क का साधला याचा राग त्यांना आहे.  राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला.  या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही.  झोपही लागत नाही.  घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे.  सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरुजी म्हणाले. 

रणजितसिंह डिसले गुरुजी व्यथित

या सगळ्या प्रकारानं ग्लोबल टीचर अवार्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) व्यथित झाले आहेत. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबर टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी एबीपी माझाला सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतं आहे. दरम्यान यावर आज जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. 

42 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण

डिसले यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. प्रतिनियुक्तीचा काळात डिसले हे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण या ठिकाणी कार्यरत नसल्याचा या चौकशी अहवालात ठपका आहे. प्रत्यक्षात एबीपी माझानं जेव्हा पडताळणी केली तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी या काळामध्ये सुमारे 42 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा अहवाल स्वतः सोलापूरच्या शिक्षण विभागानं लिहिल्याचे दिसले आहे. याशिवाय रणजितसिंह यांच्या पहिल्या वर्षाचा प्रतिनियुक्तीचा जेव्हा मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा ते समाधानकारक असल्यामुळे पुन्हा दोन वर्षाचा मुदतवाढ देण्याचा निर्णय पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला त्याचाही पुरावा एबीपी माझाकडं डिसले यांनी दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे अकरा महिन्यापूर्वी सादर झालेल्या अहवालावर आता 25 जानेवारीला रणजित डिसले यांना मिळालेला फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी कागदपत्र दाखल करण्याची वेळ अंतिम टप्प्यावर आल्यावर मगच ही कारवाई का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.

चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल -शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार

ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. 2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली. 

पार्श्वभूमी

सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त झालेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिलीय. 2017 साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दिली. 

42 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण

डिसले यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. प्रतिनियुक्तीचा काळात डिसले हे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण या ठिकाणी कार्यरत नसल्याचा या चौकशी अहवालात ठपका आहे. प्रत्यक्षात एबीपी माझानं जेव्हा पडताळणी केली तेव्हा रणजितसिंह डिसले यांनी या काळामध्ये सुमारे 42 हजार विद्यार्थी आणि दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा अहवाल स्वतः सोलापूरच्या शिक्षण विभागानं लिहिल्याचे दिसले आहे. याशिवाय रणजितसिंह यांच्या पहिल्या वर्षाचा प्रतिनियुक्तीचा जेव्हा मूल्यांकन करण्यात आलं तेव्हा ते समाधानकारक असल्यामुळे पुन्हा दोन वर्षाचा मुदतवाढ देण्याचा निर्णय पुण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला त्याचाही पुरावा एबीपी माझाकडं डिसले यांनी दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे अकरा महिन्यापूर्वी सादर झालेल्या अहवालावर आता 25 जानेवारीला रणजित डिसले यांना मिळालेला फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी कागदपत्र दाखल करण्याची वेळ अंतिम टप्प्यावर आल्यावर मगच ही कारवाई का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.

रणजितसिंह डिसले गुरुजी व्यथित

या सगळ्या प्रकारानं ग्लोबल टीचर अवार्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) व्यथित झाले आहेत. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबर टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी एबीपी माझाला सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतं आहे. दरम्यान यावर आज जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. 

काय म्हणाले रणजितसिंह डिसले?
रणजितसिंह डिसले Abp Majha सोबत बोलताना म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मानसिक त्रास झाला. जेवणावळी कराव्या अशी मागणी केली गेली.  ते म्हणाले की, 25 जानेवारीला फुलब्राईटसाठी अंतिम कागदपत्रे दाखल करायची आहेत.14  डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता, त्यावर अद्याप निर्णय नाही.  फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. 

डिसले म्हणाले की, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क का साधला याचा राग त्यांना आहे.  राज्यपालांशी थेट संपर्क झाला, यानंतर अधिकाऱ्यांनी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला.  या व्यवस्थेत राहणे शक्य होत नाही.  झोपही लागत नाही.  घरी सगळ्यांशी चर्चा केली आहे. बाहेर पडायचे ठरवले आहे.  सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित आहे. वारे सर व्हायच्या आधी बाहेर पडणार असल्याचं डिसले गुरुजी म्हणाले. 

डिसले गुरुजींवर काय आहेत आरोप
रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट  स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे.  याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं 

भाजपकडून निषेध -
ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे बार्शी जी सोलापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांनी PHD करण्यासाठी अमेरिका जायला रजा मागितली. पण शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले यांना रजा नाकारणे, त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेणे निंदनीय आहे. देशाच्या शिक्षण क्षेत्राची मान उंचवणाऱ्या गुरुजीला असा अनुभव येणे चुकीचे असून अशा शिक्षणधिकाऱ्याचा निषेध आहे, असं भाजपचे राज्य प्रवके राम कुलकर्णी यांनी केला आहे.  

कोण आहेत रणजित डिसले? 
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले
- QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम
- कार्याची दखल घेत त्यांना 4 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- जून 2021 मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली
- शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठकडून 20 नोव्हेंबर 2021 रोजी मानद डॉक्टरेट प्रदान
- 1 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- याच स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे
 
काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?
- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप 
- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर 
- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
-  लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.

संबंधित बातम्या

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत

ग्लोबल टीचरची लोकल कुचंबणा! जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मंजूर करण्यात आडकाठी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.