ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंना सरकारी 'बाबूं'चा त्रास, नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत
Global Teacher Ranjitsinh Disale : रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Global Teacher Ranjitsinh Disale : ग्लोबल टीचर अॅवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले सरकारी शिक्षकाची नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबल टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पैशाची मागणी केलीएवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी एबीपी माझाला सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतंय.
डिसले गुरूजी म्हणाले, राज्यपाल येणार होते तेव्हा थेट राज्यपालांशी संपर्क साधला याचा राग मनात धरला होता. राज्यपालांशी थेट संपर्क झाल्यानंतर अधिकाऱ्यानी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला होता. त्यामुळे अशा वातावरणात या व्यवस्थेत राहणे शक्य नाही. झोपही शांत लागत नाही. घरी सगळ्यांळी चर्चा केली. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित असून वारे सर होण्याअगोदर बाहेर पडणार आहे.
काय आरोप आहेत?
रणजितसिंह डिसले गुरुजी कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाय. त्यामुळं डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटलंय. रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. काल जेव्हा डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितले गेलं आणि इतरही गंभीर आरोप केले.
संबंधित बातम्या