Vijaydurg Fort : इतिहासातील सोनेरी पान 'विजयदुर्ग' किल्ला दयनीय स्थितीत; हिंदु जनजागृती समितीचा आंदोलनाचा इशारा
Vijaydurg Fort : पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा इशारा हिंदू जनजागृती समितीकडून दिला आहे.
Vijaydurg Fort : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात स्वराज्यासाठी लढाई लढलेला, अनेक परकीय आक्रमणे अत्यंत यशस्वीरीत्या परतवणारा, मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पान असणारा विजयदुर्ग किल्ला पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे अत्यंत दयनीय स्थितीत आहे. या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेला माहितीच्या अधिकारात अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली आहे.
"...अन्यथा पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू"
विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी वर्ष 2014 ते 2021 या 7 वर्षांच्या कालावधीत 50 लाख 16 हजार खर्च करण्यात आले. मात्र किल्ल्यावर झाडी झुडपे, अनेक वर्षे अस्वच्छ असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आणि विहिरी तशाच आहेत. मग हे पैसे गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला. गेल्या 20 वर्षांत एकदाच किल्ल्याची पाहणी करणाऱ्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना गड-किल्ल्यांविषयी कसलीच आस्था नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू, तसेच केंद्रीय पर्यटनमंत्र्यांपर्यंत हा विषय पोचवून अधिकाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिला.
हिंदु जनजागृती समितीचा इशारा
मागील 7 वर्षांच्या कालावधीत एकूण 50 लाख 16 हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र हा खर्च करूनही किल्ल्याच्या सर्वत्र वाढलेली झाडे-झुडपे, अनेक वर्षे अस्वच्छ असणाऱ्या पाण्याच्या टाक्या आणि विहिरी, तसेच आत 30 वर्षांपेक्षाही अधिक काळ मोडकळीस आलेले अतिथीगृहाचे बांधकाम आहे. प्रसाधनगृहाच्या अभावामुळे परिसरात अस्वच्छता आहे. 50 लाख रुपये खर्च करूनही काहीच बदल होत नसेल, तर यात निधीचा भ्रष्टाचार झाला असे म्हणण्यास वाव आहे. त्यामुळे या प्रकारात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर एका महिन्यात कारवाई करावी, अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आम्ही आंदोलन करू असा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे.
संबंधित बातम्या
जंजिरा किल्ल्यावर जाण्याचा प्लान करताय? त्याआधी ही बातमी वाचा
कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला ब्रेक, 31 ऑगस्टपर्यंत वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद